IND vs AUS 4th Test : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेला अहमदाबाद कसोटी सामना निकाली निघण्याची शक्यता कमी आहे. बॉर्डर-गावस्कर सीरीजमधला हा चौथा अखरेचा कसोटी सामना आहे. चौथ्या कसोटी सामन्याची ड्रॉ होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. टीम इंडियाकडे कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी आहे. त्यामुळे बॉर्डर-गावस्कर ट्रॉ़फी टीम इंडियालाच मिळणार. दरम्यान टीम इंडियासाठी गुड न्यूज आहे. न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामन्यात विजय मिळवलाय. त्यामुळे टीम इंडिया WTC च्या फायनलमध्ये पोहोचली आहे.
पहिल्या डावात टीम इंडियाकडे 91 धावांची आघाडी होती. काल चौथ्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद 3 धावा झाल्या होत्या. आता लंचला खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 1 बाद 73 रन्स झाल्या आहेत. आज पाचव्या दिवशी टीम इंडियाला फक्त नाइट वॉचमन कुहनेमनच्या रुपाने एक विकेट मिळाली.
हेड-लाबुशेनने रोवले पाय
अश्विनने हे यश मिळवून दिलं. त्याने 11 व्या ओव्हरमध्ये कुहनेमनला LBW आऊट केलं. ट्रेविस हेड (45) आणि मार्नल लाबुशेन (22) धावांवर खेळतोय. ऑस्ट्रेलियाची टीम अजून 18 धावांनी पिछाडीवर आहे. त्यांचे 9 फलंदाज शिल्लक आहेत.
तरच, विजयाची आशा
मॅचची सध्याची स्थिती बघता, कसोटी ड्रॉ च्या दिशेने चाललीय. आज रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजाकडून भरपूर अपेक्षा होत्या. पण पहिल्या सत्रात ते प्रभाव पाडू शकले नाही. हेड आणि लाबुशेनने नेटाने त्यांच्या गोलंदाजीचा सामना करतायत. आता दुसऱ्या सेशनमध्ये काही चमत्कार घडला तरच, विजयाची आशा आहे. टीम इंडियाच्या बॉलर्सना उच्च स्तराची बॉलिंग करावी लागेल.
असं घडलं नाही
पहिली नागपूर कसोटी, त्यानंतर दिल्ली आणि इंदोर टेस्ट मॅचमध्ये सामना तीन दिवसात निकाली निघाला होता. खेळपट्टीवर चेंडू पहिल्या दिवसापासून टर्न होत होता. पण अहमदाबादची विकेट आतापर्यंत फलंदाजीला अनुकूल राहिली आहे. आज शेवटत्या दिवशी खेळपट्टीवर चेंडूला चांगला टर्न मिळेल असं वाटलं होतं. पण असं घडलं नाही.