IND vs AUS 4th Test : इंदोर कसोटीत टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला 9 विकेटने पराभूत केलं. टीम इंडियासाठी हा अनेपक्षित पराभव आहे. हा पराभवाचा धक्का बसल्याने BCCI आणि रोहित शर्माला आपला प्लान बदलावा लागला आहे. WTC फायनलचा विचार करुन टीम इंडियाला अहमदाबादमध्ये हिरवीगार खेळपट्टी हवी होती. जेणेकरुन चांगली प्रॅक्टिस करता येईल. पण इंदोरच्या पराभवामुळे टीम इंडिया फिरकीला पोषक खेळपट्टी बनवण्याच्या जुन्या रणनितीनाच अवलंब करणार आहे. इंग्लंडच्या टीमसाठी अहमदाबादची खेळपट्टी जशी बनवली होती, तशीच विकेट बॉर्डर-गावस्कर सीरीजच्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी बनवण्यात येणार आहे.
टीम इंडिया या सीरीजमध्ये 2-1 ने आघाडीवर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी टीम इंडियाला चौथा शेवटचा कसोटी सामना जिंकावाच लागेल.
टीम इंडियाला पुनरागमन करता आलं नाही
रोहित शर्माला इंदोर कसोटी जिंकून मालिकेत 3-0 ची विजयी आघाडी घेण्याचा विश्वास होता. पण पहिल्या इनिंगमध्ये मॅथ्यू कुहनेमनच्या डावखुऱ्या फिरकीसमोर टीम इंडियाचा डाव ढेपाळला. त्यानंतर या संपूर्ण सामन्यात टीम इंडिया पुनरागमन करु शकली नाही. ऑस्ट्रेलियाचा नियमित कॅप्टन पॅट कमिन्स आई आजारी असल्याने मायदेशी गेला आहे. त्याच्या अनुपस्थितीत स्टीव्ह स्मिथने टीमच नेतृत्व केलं.
सूत्राने काय सांगितलं?
“भारतीय टीम मॅनेजमेंटकडून आम्हाला कोणतीही सूचना मिळालेली नाही. प्रत्येक सीजमध्ये जशी खेळपट्टी बनवतो, स्थानिक क्युरेटर तशीच नॉर्मल विकेट आता बनवत आहेत” असं राज्य असोशिएशनच्या सूत्राने पीटीआयला सांगितलं. तिसऱ्या कसोटी सामन्याआधी रोहित शर्माने WTC फायनलसाठी हिरव्यागार खेळपट्टीवर प्रॅक्टिसची इच्छा व्यक्त केली होती. इनसाइड स्पोर्ट्ने हे वृत्त दिलय.
शेवटच्या सामन्यावेळी अहमदाबादची विकेट कशी होती?
बीसीसीआय किंवा टीम मॅनेजमेंटकडून कोणतीही सूचना मिळालेली नाही. त्यामुळे गुजरात क्रिकेट असोशिएशनचे क्युरेटर बॅटिंग विकेट बनवत आहेत. इथे खेळल्या गेलेल्या शेवटच्या रणजी सामन्यात रेल्वेने गुजरात विरुद्ध 508 धावांचा डोंगर उभारला. आता सुद्धा अशीच विकेट बनवली जात आहे.
इच्छा असून पण एक गोष्ट करता येणार नाही
नागपूर आणि दिल्ली दोन्ही कसोटी सामने तीन दिवसात निकाली निघाले. इंदोरचा कसोटी सामना सुद्धा तीन दिवसातच संपला. फक्त निकाल वेगळा लागला. आतापर्यंत फिरकीसमोर चाचपडणाऱ्या ऑस्ट्रेलियाने इंदोरमध्ये टीम इंडियालाच फिरकीच्या जाळ्यात फसवलं. त्यामुळे आता चौथ्या कसोटी सामन्यात इच्छा असूनही टीम इंडियाला फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर खेळाव लागणार आहे. कारण तेच टीम इंडियाच बलस्थान आहे.