Ind vs Aus 1st Test : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये आजपासून टेस्ट सीरीजला सुरुवात होत आहे. नागपूर येथे पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सीरीजमध्ये ऑस्ट्रेलियाने आधीच भारताच्या फिरकी गोलंदाजीचा धसका घेतलाय. बॅटिंगमध्ये ओपनर डेविड वॉर्नरवर त्यांची मुख्य भिस्त असेल. डेविड वॉर्नर क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये जबरदस्त खेळाडू आहे. आपल्या बॅटिंगच्या जोरावर कुठल्याही सामन्याच चित्र पालटण्याची त्याची क्षमता आहे. त्यामुळे डेविड वॉर्नर ऑस्ट्रेलियन टीममधील सर्वात धोकादायक फलंदाज आहे. डेविड वॉर्नरचा दिवस असेल, तर त्याला रोखणं कुठल्याही गोलंदाजाला जमणार नाही. हे याआधी सुद्धा दिसून आलय. त्यामुळे डेविड वॉर्नरला लवकरात लवकर बाद करण्याचा टीम इंडियाच्या गोलंदाजांचा प्रयत्न असेल. कारण तो खेळपट्टीवर टिकला, तर ऑस्ट्रेलियाच्या धावगतीला लगाम घालणं कठीण होऊन बसेल.
डेविड वॉर्नरचे वेगळे डावपेच
डेविड वॉर्नर मूळात लेफ्टी बॅट्समन आहे. त्याने आतापर्यंत लेफ्टी बॅटिंग केलीय. पण नागपूर कसोटीत तुम्हाला हे चित्र बदलेलं दिसू शकतं. नागपूर कसोटीसाठी डेविड वॉर्नरने वेगळे डावपेच आखलेत. त्याची झलक नेट प्रॅक्टिसमध्ये दिसून आली.
हेच चित्र नागपूर कसोटीत दिसेल
ऑस्ट्रेलियन मीडियाच्या रिपोर्ट्नुसार डेविड वॉर्नर रायटी सुद्धा बॅटिंग करु शकतो. रविंद्र जाडेजा आणि अक्षर पटेल या टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजांविरोधात डेविड वॉर्नर रायटी बॅटिंग करु शकतो, असं ऑस्ट्रेलियन मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलय. अलीकडेच नेट प्रॅक्टिसमध्ये डेविड वॉर्नरने रायटी बॅटिंगची झलक दाखवली होती. हेच चित्र नागपूर कसोटीत पहायला मिळेल.
Extraordinary skill – @davidwarner31 switching between batting left and right handed in the nets at Alur #INDvAUS pic.twitter.com/6cHhJAcvSm
— Louis Cameron (@LouisDBCameron) February 5, 2023
वॉर्नरने टीममधल्या सहकाऱ्यांना काय सांगितलय?
काही भारतीय बॉलर्स विरोधात मी रायटी बॅटिंग करेन, असं डेविड वॉर्नरने टीममधील सहकाऱ्यांना सांगितल. फॉक्स स्पोर्ट्सने हे वृत्त दिलय. रविंद्र जाडेजा आणि अक्षर पटेल या दोन लेफ्टी स्पिन गोलंदाजांचा सामना करताना वॉर्नर रायटी बॅटिंग करु शकतो.
ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये किती लेफ्टी?
परिस्थिती पाहून डेविड वॉर्नर रायटी खेळायचं की, लेफ्टी ते ठरवेल. नागपूरच्या विकेटवर लेफ्टी बॅट्समनने तितक्या सहजतेने बॅटिंग करता येणार नाही, असं म्हटलं जातय. फिरकी गोलंदाजांना मदत मिळावी, यासाठी भारताने नागपूरच्या विकेटशी छेडछाड केल्याचा आरोप ऑस्ट्रेलियन मीडियाने केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये एकूण 5 लेफ्टी बॅट्समन आहेत.