IND vs AUS: 6,6,6 हार्दिकने काय धुतलं राव, 12 बॉलमध्ये ठोकल्या 58 रन्स, एकदा तुफानी बॅटिंगचा VIDEO बघा

| Updated on: Sep 21, 2022 | 11:27 AM

IND vs AUS: टीम इंडिया हरली, पण हार्दिकने जिंकलं. एकदा त्याची जबरदस्त बॅटिंग पहा

IND vs AUS: 6,6,6 हार्दिकने काय धुतलं राव, 12 बॉलमध्ये ठोकल्या 58 रन्स, एकदा तुफानी बॅटिंगचा VIDEO बघा
Hardik-pandya
Image Credit source: social media
Follow us on

मुंबई: टीम इंडियासाठी ऑस्ट्रेलिया विरुद्ध T20 सीरीजची सुरुवात निराशाजनक झाली आहे. आशिया कपमध्ये टीम इंडियाने खराब प्रदर्शन केल. निदान मायदेशात, तरी टीम चांगली कामगिरी करेल, असा चाहत्यांना वाटलं होतं. पण असं घडलं नाही. पहिल्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 4 विकेट राखून सहज विजय मिळवला. महत्त्वाच म्हणजे टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर 208 धावांच विशाल लक्ष्य उभं केलं होतं. तरीही पराभव झाला.

आपली क्षमता दाखवून दिली

टीम इंडिया हरल्याने चाहते निराश आहे. पण एका खेळाडूने सर्वांच मन जिंकून घेतलं. त्याचं नाव आहे हार्दिक पंड्या. काल हार्दिकने पुन्हा एकदा हार्दिकने आपली क्षमता दाखवून दिली. हार्दिकने ऑस्ट्रेलिया विरुद्ध तुफानी बॅटिंग केली. त्याने टीमला 200 पार पोहोचवलं. हार्दिक पंड्या सध्याच्या घडीला टीम इंडियाचा प्रमुख आधारस्तंभ आहे.

पुन्हा टीममध्ये दिसेल का?

आयपीएलपासून हार्दिक पंड्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. प्रत्येक सीरीजमध्ये त्याने आपली छाप उमटवली आहे. आयपीएलआधी हार्दिक पंड्या पुन्हा टीममध्ये दिसेल का? असा प्रश्न काहीजण विचारत होते. त्यावेळी त्याचा फॉर्म आणि फिटनेसशी संघर्ष सुरु होता. आता हा तोच हार्दिक आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

इथे क्लिक करुन हार्दिक पंड्याची तुफानी बॅटिंग पहा

गोलंदाजांचा अक्षरक्ष: पालापाचोळा केला

हार्दिकने काल ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा अक्षरक्ष: पालापाचोळा केला. त्याने 30 चेंडूत नाबाद 71 धावा चोपल्या. यात 7 चौकार आणि 5 षटकार होते. मोहालीमध्ये काल पहिला टी 20 सामना झाला. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी केली. कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली काही खास करु शकले नाहीत.

त्या पायावर कळस चढवला

केएल राहुल आणि सूर्यकुमार यादवने दमदार फलंदाजी केली. त्यांनी मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. हार्दिकने त्या पायावर कळस चढवला. त्या दोघांनी डावाला आकार दिला होता. हार्दिकने त्याचा फायदा उचलला.

हार्दिकवर काही परिणाम झाला नाही

12 व्या ओव्हरमध्ये केएल राहुल आऊट झाल्यानंतर हार्दिकने क्रीजवर आला. त्याने अजिबात वेळ दवडला नाही. फटकेबाजी सुरु केली. हार्दिक क्रीजवर असताना सूर्यकुमार, दिनेश कार्तिक आणि अक्षर पटेल बाद झाले. पण त्याचा हार्दिकवर काही परिणाम झाला नाही. त्याने आपली आक्रमक बॅटिंग सुरुच ठेवली. हार्दिकने आपल्या इनिंगमध्ये (7 चौकार, 5 षटकार) 58 धावा फक्त 12 चेंडूत कुटल्या. त्यावरुन त्याच्या तुफानी बॅटिंगची कल्पना येते.