IND vs AUS 4th Test : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावस्कर सीरीजमधला चौथा कसोटी सामना थोड्याच वेळात सुरु होईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही टेस्ट मॅच होत आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचा उत्साह वाढवण्यासाठी दोन्ही देशाचे पंतप्रधान मैदानावर उपस्थित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी टॉसच्यावेळी मैदानावर दिसतील. भारत-ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टीव्ह स्मिथने टॉस जिंकला आहे. त्याने पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय.
टीम इंडियाला जिंकावच लागेल
ऑस्ट्रेलियन टीमने आधीच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताला WTC च्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी चौथा कसोटी सामना जिंकावाच लागेल.भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या मैत्रीला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून एका खास नाण्याचा वापर करण्यात आला.
टीम इंडियात एकमेव बदल
चौथ्या कसोटीत मोहम्मद सिराजला विश्रांती देऊन त्याच्याजागी मोहम्मद शमीचा प्लेइंग 11 मध्ये समावेश करण्यात आलाय. तिसऱ्या कसोटीत शमीला विश्रांती दिली होती.
अशी आहे दोन्ही टीम्सची प्लेइंग XI
भारत : रोहित शर्मा ( कॅप्टन), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, उमेश यादव
4TH TEST. India XI: S Gill, R Sharma (c), C Pujara, V Kohli, S Iyer, S Bharat (wk), A Patel, R Ashwin, R Jadeja, U Yadav, M Shami. https://t.co/KjJudHw47Q #INDvAUS @mastercardindia
— BCCI (@BCCI) March 9, 2023
ऑस्ट्रेलिया: ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ (कॅप्टन), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरुन ग्रीन, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नाथन लायन, टॉड मर्फी, मॅथ्यू कुहनेमन
अहमदाबाद टेस्ट मॅचमध्ये खेळपट्टीबद्दल उत्सुक्ता आहे. नागपूर, दिल्ली आणि इंदोर कसोटीत टर्निंग विकेट्स होत्या. हे तिन्ही कसोटी सामने तीन दिवसात निकाली निघाले. आता अहमदाबादच्या चौथ्या कसोटी सामन्यात खेळपट्टी कशी असेल? त्याची उत्सुकता आहे. स्पोर्टिंग विकेट असेल, तर गोलंदाजी बरोबर फलंदाजीलाही वाव मिळेल. मागच्या तीन कसोटी सामन्यात रविंद्र जाडेजा आणि रविचंद्रन अश्विनची फिरकी गोलंदाजी ऑस्ट्रेलियाला भारी पडली आहे.