IND vs AUS 3rd Test : इंदोर टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाची पहिली इनिंग संपली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 197 रन्स केल्या. ऑस्ट्रेलियाकडे 88 धावांची आघाडी आहे. भारताने आपल्या पहिल्या डावात 109 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 6 विकेट 11 रन्समध्ये गमावल्या. पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने 156 धावात 4 विकेट गमावल्या होत्या. आज दुसऱ्यादिवसाच्या खेळाला सुरुवात केल्यानंतर 186 धावांवर ऑस्ट्रेलियाच्या चारच विकेट होत्या. पण हँडसकॉम्ब आणि कॅमरुन ग्रीनची जोडी तुटली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला.
अश्विन-उमेशने घेतल्या 3-3 विकेट
पहिल्या दिवशी रविंद्र जाडेजाने एकट्याने 4 विकेट काढल्या होत्या. दुसऱ्यादिवशी रविचंद्रन अश्विन आणि उमेश यादवने ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडलं. दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या. अश्विनने पीटर हँडसकॉम्बला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. त्यानंतर उमेश यादवने कॅमरुन ग्रीनला LBW बाद केलं.
उमेश यादवने मिचेल स्टार्कला बोल्ड केलं, तर एलेक्स कॅरीला अश्विनने LBW बाद करुन ऑस्ट्रेलियाला धक्का दिला. त्यानंतर टॉड मर्फीला उमेश यादवने क्लीन बोल्ड केलं. नाथन लेयॉनची विकेट अश्विनने काढली.
विजयासाठी ऑस्ट्रेलियासमोर किती धावांच लक्ष्य ठेवांव?
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 197 धावा करुन इंदोर कसोटीत 88 धावांची आघाडी घेतली. मॅचच पारडं आपल्या बाजूने झुकवण्यासाठी टीम इंडियाला चांगली फलंदाजी करावी लागेल. ऑस्ट्रेलियाचा लीड फेडत नाही, तो पर्यंत एकही विकेट गमावू नये. इंदोरमध्ये विजयासाठी भारताने ऑस्ट्रेलियासमोर कमीत कमी 250 धावांच लक्ष्य ठेवलं पाहिजे.