IND vs AUS Indore Test : सध्या केएल राहुलच्या टीम इंडियातील निवडीवरुन मोठा गहजब निर्माण झालाय. सातत्याने खराब कामगिरी करुनही केएल राहुलची टीम इंडियात का निवड केली जातेय? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांकडून उपस्थित केला जातोय. बॉर्डर-गावस्कर सीरीजच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी तसच ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे सीरीजसाठी केएल राहुलची टीम इंडियात निवड करण्यात आलीय. त्यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. केएल राहुलला टीम इंडियात निवडलय हे खरं आहे. पण तिसऱ्या इंदोर कसोटीसाटी त्याला टीममध्ये स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे.
रोहितची चलाख खेळी
दबाव कमी करण्यासाठी केएल राहुलला उपकर्णधारपदावरुन हटवण्यात आलय. त्याचवेळी त्याच्याजागी दुसऱ्या उपकर्णधाराची निवड करण्यात आलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिलेक्टर्सनी केएल राहुलला उपकर्णधारपदावरुन हटवलेलं नाही. हे काम रोहित शर्माने केलय. बातम्यांनुसार, सिलेक्टर्सनी रोहित शर्माला निर्णय घेण्याच स्वातंत्र्य दिलं होतं. रोहितने कुठल्याच प्लेयरला तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी उपकर्णधार बनवलेलं नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, “टीममध्ये कोणीच उपकर्णधार नसेल हा निर्णय घेण्यात आला. रोहितच्या अनुपस्थितीत कोण नेतृत्व करेल? ते ठरवण्याचा अधिकार रोहितला देण्यात आला”
आता असं बंधन नसेल
रोहितने कोणालाच उपकर्णधार बनवलेलं नाही. राहुल उपकर्णधार असल्यामुळे त्याला टीममध्ये खेळवणं भाग पडत होतं. पण आता तो उपकर्णधार नसल्यामुळे त्याला टीममधून डच्चू देण्याचा मार्ग मोकळा झालाय. राहुलच्या जागी शुभमन गिलला ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात संधी मिळू शकते. कारण चांगल्या फॉर्ममध्ये असूनही फक्त केएल राहुलसाठी शुभमन गिलला बेंचवर बसवल जातय. त्यावर अनेक माजी क्रिकेटपटूंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलय.
हे टॅलेट टीमच्या उपयोगाला किती येतं?
केएल राहुलने ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट सीरीजमध्ये पहिल्या दोन कसोटीत 20,17 आणि 1 रन्स केला. त्याआधी सुद्धा त्याची कामगिरी फार चांगली नाहीय. त्यामुळे टीममधील त्याच्या निवडीवर सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलय. राहुलमध्ये टॅलेंट असल्यामुळे त्याला संधी दिली जाते, असं टीम मॅनेजमेंटच म्हणणं आहे. पण हे टॅलेट टीम इंडियाच्या उपयोगाला किती येतं? हा खरा मुद्दा आहे.