IND vs AUS Warm up Match: KL Rahul च तुफानी हाफ सेंच्युरी, टीम इंडियाची दमदार सुरुवात

| Updated on: Oct 17, 2022 | 10:24 AM

IND vs AUS Warm up Match: राहुलने हाफ सेंच्युरी झळकावली, त्यावेळी कॅप्टन रोहित शर्मा अवघ्या 1 रन्सवर खेळत होता.

IND vs AUS Warm up Match: KL Rahul च तुफानी हाफ सेंच्युरी, टीम इंडियाची दमदार सुरुवात
KL Rahul
Image Credit source: social
Follow us on

मुंबई: ICC T20 वर्ल्ड कपच्या पहिल्या वॉर्मअप मॅचमध्ये केएल राहुलने जबरदस्त बॅटिंग केली. केएल राहुलने (KL Rahul) अवघ्या 27 चेंडूत अर्धशतक फटकावलं. राहुलने डावाच्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर (Australian Bowlers) हल्लाबोल केला. त्याने 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने अर्धशतक फटकावलं. राहुलने हाफ सेंच्युरी झळकावली, त्यावेळी कॅप्टन रोहित शर्मा अवघ्या 1 रन्सवर खेळत होता.

राहुलने कुठल्या गोलंदाजांना धुतलं?

केएल राहुलने पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस कोणालाही दयामाया दाखवली नाही. भारताने पावरप्लेमध्येच 69 धावा फटकावल्या. राहुलने दमदार बॅटिंग केली. त्याची इनिंग 8 व्या ओव्हरमध्ये संपली. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर आऊट झाला. केएल राहुलने 172 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. त्याने आपल्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं.

वॉर्मअप मॅचआधी भारत-ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेवन

ICC T20 वर्ल्ड कप टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध ब्रिस्बेन येथे पहिला सराव सामना खेळत आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीला बोलावल. ऑस्ट्रेलियाच्या आजच्या सराव सामन्यासाठी 4 मोठ्या खेळाडूंना बाहेर ठेवलं आहे. टीम इंडियाने 15 सदस्यीय टीमची घोषणा केली आहे.

दीपक हुड्डा, ऋषभ पंत, मोहम्मद शमी आणि युजवेंद्र चहल टीम इंडियाच्या मेन प्लेइंग 11 चा भाग नाहीयत. पण या खेळाडूंना फलंदाजी आणि गोलंदाजीची संधी दिली जाईल. ऑस्ट्रेलियाने आपल्या टीममध्ये डेविड वॉर्नर, मॅथ्यू वेड, जोश हेझलवूड आणि एडम झम्पा यांना आराम दिला आहे.

ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेवन: एरॉन फिंच, मिचेल मार्श, स्टीव स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, टिम डेविड, जॉश इंग्लिस, पॅट कमिंन्स, एश्टन एगर, मिचेल स्टार्क आणि केन रिचर्डसन.

भारतीय टीम: रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, दीपक हुड्डा, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, आर अश्विन, हर्षल पटेल, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल.