IND vs AUS: मॅचआधी मोहम्मद अझरुद्दीनचा थेट मैदानातून ग्राऊंड रिपोर्ट, दिली महत्त्वाची अपडेट

| Updated on: Sep 14, 2022 | 3:51 PM

सध्या सर्वत्र T20 वर्ल्ड कपची चर्चा आहे. पण त्याआधी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी 20 सीरीज खेळणार आहे. 20 सप्टेंबरपासून ही सीरीज सुरु होणार आहे.

IND vs AUS: मॅचआधी मोहम्मद अझरुद्दीनचा थेट मैदानातून ग्राऊंड रिपोर्ट, दिली महत्त्वाची अपडेट
mohammed azharuddin
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई: सध्या सर्वत्र T20 वर्ल्ड कपची चर्चा आहे. पण त्याआधी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी 20 सीरीज खेळणार आहे. 20 सप्टेंबरपासून ही सीरीज सुरु होणार आहे. या सीरीजमधला एक सामना हैदराबादमध्ये होणार आहे. हैदराबादमधल्या या मॅचचा ग्राऊंड रिपोर्ट मोहम्मद अझरुद्दीनने शेयर केलाय. अझरुद्दीन भारताचा माजी कर्णधार आहे.

हैदराबादमध्ये कधी होणार सामना?

सामन्याच्या आयोजनासाठी कशी तयारी सुरु आहे, ती माहिती अझरुद्दीनने दिली आहे. भारत-ऑस्ट्रेलियामधील टी 20 सीरीजचा तिसरा सामना हैदराबादमध्ये होणार आहे. हा सामना 25 सप्टेंबरला होईल. या मॅचची जोरदार तयारी सुरु आहे. त्याची माहिती अझरुद्दीनने दिलीय.

अजहरुद्दीनचा ग्राऊंड रिपोर्ट

अझरुद्दीनने आपला ग्राऊंड रिपोर्ट थेट टि्वटरवर शेयर केलाय. “सामन्याच्या यशस्वी आयोजनासाठी जोरदार तयारी सुरु आहे. मैदान तयार करण्यासाठी टीम दिवस-रात्र मेहनत घेतेय” अझरुद्दीनने टि्वटमधून ही माहिती दिलीय,

तिकीट विक्री कधी?

तिकीट विक्रीबद्दल अझरुद्दीनने महत्त्वाची अपडेट दिलीय. हैदराबादमधील या सामन्यासाठी 15 सप्टेंबरपासून तिकीट विक्री सुरु होणार आहे. हे तिकीटस पेटीएम वेबसाइटवर उपलब्ध असतील.


किती तारखेला होणार मॅच?

मोहालीलमध्ये पहिला, नागपूरमध्ये दुसरा आणि हैदराबादमध्ये तिसरा टी 20 सामना होईल. पहिला सामना 20 सप्टेंबर, दुसरा 23 सप्टेंबर आणि तिसरा सामना 25 सप्टेंबरला होईल.