IND vs AUS : टेस्ट नंतर आता वनडेमध्येही टॅलेंटेड प्लेयरवर होणार अन्याय, कॅप्टन रोहित त्याला बेंचवर बसवून ठेवणार

| Updated on: Mar 13, 2023 | 9:29 AM

IND vs AUS : टेस्ट सीरीजनंतर आता वनडे मालिकेतही टीम इंडियाच्या टॅलेंटेड खेळाडूवर अन्याय होणार. कॅप्टन रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन वनडे सामन्यांच्या सीरीजमध्ये या खेळाडूला बेंचवर बसवून ठेऊ शकतो.

IND vs AUS : टेस्ट नंतर आता वनडेमध्येही टॅलेंटेड प्लेयरवर होणार अन्याय, कॅप्टन रोहित त्याला बेंचवर बसवून ठेवणार
कपिल देव यांनी रोहित शर्माला दिलं विराट कोहलीचं उदाहरण, म्हणाले...
Image Credit source: PTI
Follow us on

IND vs AUS : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये 17 मार्चपासून तीन सामन्यांची वनडे सीरीज सुरु होणार आहे. टेस्ट सीरीजनंतर आता वनडे मालिकेतही टीम इंडियाच्या एका टॅलेंटेड मॅचविनर खेळाडूवर अन्याय होईल. कॅप्टन रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन वनडे सामन्यांच्या सीरीजमध्ये या खेळाडूला बेंचवर बसवून ठेऊ शकतो. कॅप्टन रोहित या खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्याचा विचार करणार नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन वनडे सामन्यांच्या सीरीजमध्ये कॅप्टन रोहित शर्मा कुठल्याही सामन्यात चायनामन स्पिनर कुलदीप यादवला संधी देणार नाही.

कुलदीपला वनडे सीरीज दरम्यान बेंचवर बसाव लागेल. रोहित शर्माने बॉर्डर-गावस्कर सीरीजच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत एकाही टेस्टमध्ये कुलदीपला संधी दिली नाही. आता वनडे सीरीजमध्येही त्याला बेंचवर बसाव लागेल.

का त्याला संधी मिळणार नाही?

वनडे सीरीजमध्ये कुलदीपला संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे. कारण रवींद्र जाडेजा आणि अक्षर पटेललाच कॅप्टन रोहितची पहिली पसंती असले. हे दोघेही फलंदाजी सुद्धा उत्तम करतात. रोहितला दोन ऑलराऊंडर्स मिळतात. त्यामुळे तो कुलदीपचा विचार करणार नाही. वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर सुद्धा प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल. त्यामुळे या टीममध्ये कुलदीप यादवच स्थानच दिसत नाही.

चांगला रेकॉर्ड असूनही बेंचवर

कुलदीप यादवने आतापर्यंतच्या क्रिकेट करिअरमध्ये जास्तवेळ बेंचवर बसून काढला आहे. चांगला रेकॉर्ड असूनही रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा आणि अक्षर पटेल सारख्या प्लेयर्समुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळत नाही. टीम इंडिया जेव्हा मायदेशात वनडे सीरीज खेळते, तेव्हा तीन स्पिन गोलंदाज खेळणार असतील, तर कुलदीपला संधी मिळते.

दुर्लक्ष का होतं?

वनडे टीममध्ये वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, रवींद्र जाडेजा आणि अक्षर पटेल आहेत. त्यामुळे बऱ्याचदा कुलदीप यादवकडे दुर्लक्ष झालय. या चौघांच्या तुलनेत कुलदीपकडे बॅटिंगची क्षमता कमी आहे. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये अन्य प्लेयर्सना प्राधान्य मिळतं.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सीरीजसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, जयदेव उनादकट