IND vs AUS : वनडे सीरीजआधी ऑस्ट्रेलियाला झटका, प्रमुख खेळाडू बाहेर, मुंबई इंडियन्सच टेन्शन वाढलं

| Updated on: Mar 06, 2023 | 2:11 PM

IND vs AUS ODI Series : 9 महिन्यानंतर पुनरागमन करणारा खेळाडू पुन्हा बाहेर. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये 3 वनडे सामन्यांची सीरीज होणार आहे. अहमदाबादमध्ये चौथी टेस्ट मॅच संपल्यानंतर वनडे सीरीज सुरु होईल.

IND vs AUS : वनडे सीरीजआधी ऑस्ट्रेलियाला झटका, प्रमुख खेळाडू बाहेर, मुंबई इंडियन्सच टेन्शन वाढलं
Australian player
Image Credit source: AFP
Follow us on

IND vs AUS ODI Series : ऑस्ट्रेलियन टीमवर संकटांचा डोंगर कोसळलाय. त्यांचा नियमित कॅप्टन मायदेशी परतलाय. आता आणखी एक खेळाडू झाई रिचर्ड्सन बाहेर गेलाय. भारताविरुद्ध वनडे सीरीजसाठी झाई रिचर्ड्सनने 9 महिन्यानंतर टीममध्ये पुनरागमन केलं होतं. झाई रिचर्ड्सन आता एकही मॅच न खेळता टीम बाहेर गेलाय. ऑस्ट्रेलियन टीमसाठी हा एक झटका आहे. IPL टीमला सुद्धा याचा फटका बसू शकतो.

झाई रिचर्ड्सनला हॅमस्ट्रिंगची दुखापत झालीय. त्यामुळे भारताविरुद्ध वनडे सीरीजमध्ये त्याला खेळता येणार नाहीय. त्याच्याजागी आता नाथन एलिसचा टीममध्ये समावेश केलाय. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये 3 वनडे सामन्यांची सीरीज होणार आहे. अहमदाबादमध्ये चौथी टेस्ट मॅच संपल्यानंतर वनडे सीरीज सुरु होईल.

ऑस्ट्रेलियासाठी शेवटचा कधी खेळला?

झाई रिचर्ड्सन जून 2022 मध्ये ऑस्ट्रेलियासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. श्रीलंकेविरुद्ध ही वनडे सीरीज होती. त्यानंतर आता मार्चमध्ये भारताविरुद्ध होणाऱ्या वनडे सीरीजसाठी त्याचा टीममध्ये समावेश करण्यात आला. हॅमस्ट्रिंग इंजरीमुळे तो वनडे सीरीजमधून बाहेर गेलाय. त्याच्या आयपीएल 2023 मध्ये खेळण्याबद्दलही सस्पेन्स कायम आहे.

4 जानेवारीपासून क्रिकेटपासून लांब

रिचर्ड्सन 4 जानेवारीपासून अजिबात क्रिकेट खेळलेला नाही. सुरुवातीला त्याची दुखापत किरकोळ वाटली होती. BBL च्या फायनलपर्यंत तो तंदुरुस्त होईल असं वाटत होतं. पण त्यानंतर त्याला बर व्हायला आणखी 2 महिने लागतील, असं समजलं. पर्थ स्क्रॉचर्ससाठी BBL फायनल, मार्श कप आणि शेफील्ड शील्डमध्ये तो नाही खेळला. भारत दौऱ्यासाठी 16 सदस्यीय ऑस्ट्रेलियन टीमची निवड झाली, त्यात रिचर्ड्सनला स्थान मिळालं होतं.

पर्थमध्ये मॅच खेळताना पुन्हा दुखापत

भारत दौऱ्यासाठी निवड झाल्यानंतर रिचर्ड्सनने थोडा सराव करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी पर्थच्या मैदानात 50 ओव्हर्सचा सामना खेळण्यासाठी उतरला. पण तो फक्त 4 ओव्हर टाकू शकला. त्यानंतर त्याला पुन्हा दुखापत झाली. स्कॅनसाठी त्याला नेण्यात आलं. त्याने या मॅचमध्ये 4 ओव्हरमध्ये 5 रन्स देऊन 3 विकेट काढल्या होत्या.

मुंबई इंडियन्सच वाढलं टेन्शन

रिचर्ड्सन ऑस्ट्रेलियाकडून वनडे सीरीजमध्ये खेळणार नाही. तो IPL मध्ये सुद्धा खेळला नाही, तर मुंबई इंडियन्सच्या अडचणी वाढतील. बुमराह दुखापतीमुळे आधीच बाहेर गेलाय. आता रिचर्ड्सन खेळला नाही, तर टीमच्या अडचणी वाढतील.