IND vs AUS Test : टीम इंडियाचा एक मोठा खेळाडू दुसऱ्या टेस्टमधून OUT

| Updated on: Feb 14, 2023 | 10:13 AM

IND vs AUS Test : पहिल्या कसोटीत बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही आघाड्यांवर टीम इंडियाने जबरदस्त प्रदर्शन केलं. रोहित शर्माने शतक ठोकलं. रविंद्र जाडेजा, अक्षर पटेलने ऑलराऊंडर परफॉर्मन्स केला.

IND vs AUS Test : टीम इंडियाचा एक मोठा खेळाडू दुसऱ्या टेस्टमधून OUT
World Test Championship च्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत! विजयानंतर कसं बदललं गणित? वाचा
Image Credit source: Twitter
Follow us on

IND vs AUS Test : टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत दमदार सुरुवात केली आहे. नागपूर कसोटीत टीम इंडियाने एका डावाने विजय मिळवला. दोन्ही इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियन टीम निष्प्रभ ठरली. पहिल्या कसोटीत बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही आघाड्यांवर टीम इंडियाने जबरदस्त प्रदर्शन केलं. रोहित शर्माने शतक ठोकलं. रविंद्र जाडेजा, अक्षर पटेलने ऑलराऊंडर परफॉर्मन्स केला. फलंदाजीत टीम इंडियाला मोठी समस्या जाणवली नाही. पाठदुखीमुळे श्रेयस अय्यर पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकला नाही. नॅशनल क्रिकेट अकदामीत तो रिहॅबच्या प्रोसेसमध्ये आहे. दिल्लीमध्ये होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही त्याच्या खेळण्याची शक्यता कमी आहे. टीम मॅनेजमेंट श्रेयस अय्यरला खेळवण्याचा धोका पत्करणार नाही. दिल्लीच्या फिरोशहा कोटला मैदानात भारत-ऑस्ट्रेलियात दुसरा कसोटी सामना रंगणार आहे. शुक्रवारपासून दुसरा कसोटी सामना सुरु होईल.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळाव लागेल

श्रेयस अय्यरने त्याच्या रिहॅब प्रोसेसचे काही व्हिडिओ पोस्ट केले होते. बंगळुरुत NCA आहे. तिथे ट्रेनर एस. रजनीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेयसची रिहॅब प्रोसेस सुरु आहे. श्रेयसच स्ट्रेंथ आणि कंडीशनिंग रुटीन सुरु आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट सामना खेळावा लागतो. कारण या मॅचमधून तुमचा फिटनेस तपासला जातो.

कुठल्या टीममधून खेळणार?

श्रेयस अय्यर मागच्या महिन्याभरापासून स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेला नाही. त्याला थेट टेस्ट मॅचमध्ये उतरवणार नाही. कारण तिथे त्याला 90 ओव्हर्स मैदानात फिल्डिंग करावी लागेल. बॅटिंग करतानाही बरेच तास खेळपट्टीवर उभ रहाव लागेल. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती शेष भारताच्या टीममध्ये श्रेयसचा समावेश करु शकते. 1 ते 5 मार्च दरम्यान त्याला मध्य प्रदेश विरुद्ध इराणी कपचा सामना खेळावा लागेल. त्याला स्वत:चा फिटनेस सिद्ध करावा लागेल. रवींद्र जाडेजालाही टीम इंडियात कमबॅक करण्याआधी तामिळनाडू विरुद्ध रणजी सामना खेळावा लागला होता.

जसप्रीत बुमराहचा फिटनेस कसा आहे?

स्ट्रेस फ्रॅक्चरने त्रस्त असलेल्या जसप्रीत बुमराहची रिकव्हरी सुद्धा मंदगतीने सुरु आहे. टीम मॅनेजमेंट ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन वनडे सामन्यात त्याला खेळवण्याचा धोका पत्करणार नाही. लंडनच्या ओव्हल मैदानात 7 ते 11 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होईल. त्यावेळी टीम इंडियाला बुमराहची गरज लागेल. त्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्धची कसोटी मालिका जिंकावी लागेल.