IND vs AUS Test : बॉर्डर-गावस्कर सीरीजमधील दुसरा कसोटी सामना खेळण्यासाठी टीम इंडिया दिल्लीत दाखल झालीय. दुसरा कसोटी सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे. नागपूरमधील पहिला कसोटी सामना जिंकून टीम इंडियाने 4 टेस्ट मॅचच्या सीरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतीय टीमला दिल्ली कसोटीत ही आघाडी वाढवून 2-0 करायची आहे. त्यांची तयारी जोरात सुरु आहे. यावेळी अखेरच्या क्षणी टीम इंडियाच दिल्लीत मुक्कामच हॉटेल बदलण्यात आलय. यावेळी टीम इंडिया दिल्लीत दुसऱ्या हॉटेलमध्ये मुक्कामाला आहे. टीम इंडियाच दिल्लीतील हॉटेल का बदलण्यात आलं? त्यामागे दोन कारणं आहेत.
नेहमी टीम इंडिया कुठल्या हॉटेलमध्ये उतरते?
टीम इंडियात दिल्लीत सामना खेळण्यासाठी येते, तेव्हा त्यांच्यासाठी ITC मौर्या आणि ताज पॅलेस हॉटेलची बुकिंग केली जाते. पण PTI च्या वृत्तानुसार, टीम इंडिया यावेळी या दोन्ही पैकी कुठल्याही हॉटेलमध्ये थांबली नाहीय.
टीम इंडियाच हॉटेल का बदललं?
PTI नुसार, यावेळी नोएडाच्या हॉटेल लीलामध्ये टीम इंडियाच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आलीय. दोन कारणांमुळे टीम इंडियाच हॉटेल बदलण्यात आलय. पहिलं कारण आहे, G20 संम्मेलन आणि दुसरं दिल्लीतील लग्नाचा सीजन. दिल्लीत ताज पॅलेस आणि ITC मौर्या दोन्ही हॉटेल्सवर मोठा लोड आहे. दोन्ही हॉटेल्समधील बहुतांश रुम्स बुक आहेत. त्यामुळे यावेळी टीम इंडियाच हॉटेल बदलण्यात आलय.
विराट टीमसोबत नव्हता
हॉटेल लीलामध्येही चांगल्या सुविधा देण्यात आल्या आहेत. पर्याय नसल्यामुळे यावेळी दुसऱ्या हॉटेलची निवड करण्यात आली, असं बीसीसीआय अधिकाऱ्याने सांगितलं. विराट कोहली टीमसोबत हॉटेलमध्ये मुक्कामाला थांबला नाहीय. विराट कोहली मूळचा दिल्लीचा आहे. तो गुरुग्राम येथील आपल्या घरी थांबलाय. आज विराट कोहली हॉटेलमध्ये चेक इन करु शकतो. विराटने घरी थांबण्यासाठी टीम मॅनेजमेंटकडून स्पेशल परवानगी घेतली होती.