Ravindra jadeja news : टीम इंडियाचे खेळाडू मैदानात सोपवलेली जबाबदारी पार पाडतातच. पण त्याचवेळी दिलेला शब्द पाळण्यातही टीम इंडियाच्या खेळाडूंचा हात कोणी धरु शकत नाही. नुकत्याच संपलेल्या बॉर्डर-गावस्कर सीरीजमध्ये ऑस्ट्रेलियन टीममध्ये मॅथ्यू कुहनेमन नावाचा एक प्लेयर होता. दिल्ली टेस्ट मॅचमध्ये त्याने डेब्यु केला. ऑस्ट्रेलियात देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो Jaddu च्या नावाने सुद्धा ओळखला जातो. हाच कुहनेमन जेव्हा रवींद्र जाडेजाला पहिल्यांदा भेटला, तेव्हा त्याने काही गोलंदाजी टिप्स मागितले होते.
रवींद्र जाडेजाने लगेच कुहनेमनची इच्छा पूर्ण केली नाही. पण बॉर्डर-गावस्कर सीरीज संपल्यानंतर मागणी पूर्ण करेन, असा शब्द दिला होता.
जे मार्गदर्शन हवं होतं, ते त्याला मिळालं
सीरीज संपताच रवींद्र जाडेजाने आपलं आश्वासन पाळलं. दिलेला शब्द पूर्ण केला. जाडेजा आणि कुहनेमनमध्ये 15 मिनिट चर्चा झाली. कुहनेमनला जाडेजाकडून जे मार्गदर्शन हवं होतं, ते त्याला मिळालं.
किती वेळ झाली चर्चा?
कुहनेमनने मुलाखतीत जाडेजाने आश्वासन पाळल्याच सांगितलं. “जवळपास 15 मिनिट आमच्यामध्ये चर्चा झाली. जाडेजाने गोलंदाजीसाठी काही महत्त्वाचे टिप्स दिल्या. बऱ्याच गोष्टींवर आम्ही चर्चा केली” असं कुहनेमनने सांगितलं.
कुहनेमनने काय सांगितलं?
“रवींद्र जाडेजाला माझी, टॉड मर्फी आणि लायनची गोलंदाजी आवडली. त्याच्याकडून हे ऐकून आम्हाला आवडलं. त्याने मला काही चांगल्या टिप्स दिल्या. ज्याचा फायदा मला भारतीय उपखंडात पुढच्या दौऱ्यात होईल” असं कुहनेमन म्हणाला.
जाडेजाचा उत्साही स्वभाव आवडला
कुहनेमनने जाडेजाने शब्द पाळला त्या बद्दल सांगितलच पण त्याच्या स्वभावाचही कौतुक केलं. “तो एक उत्साही, नेहमीच मदतीसाठी तत्पर असलेला माणूस आहे. ते इन्स्टाग्रामवर मला मेसेजही पाठवतात” असं कुहनेमनने सांगितलं.
मॅचविनिंग परफॉर्मन्स
बॉर्डर-गावस्कर सीरीजमध्ये कुहनेमन 3 टेस्ट मॅच खेळला. यात त्याने 9 विकेट काढले. इंदोर टेस्ट मॅचमध्ये त्याने 16 धावा देऊन 5 विकेट काढल्या. हा कुहनेमनचा मॅचविनिंग परफॉर्मन्स होता.