India vs Australia 1st Test : भारत-ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावस्कर सीरीज होणार आहे. येत्या 9 फेब्रुवारीपासून नागपूरमधून सीरीज सुरु होणार आहे. ही कसोटी मालिका सुरु होण्याआधी आधी टीम इंडियाला झटका बसला. श्रेयस अय्यर दुखापतीमुळे पहिल्या कसोटीत खेळू शकणार नाहीय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रेयस अय्यर अजून दुखापतीमधून सावरलेला नाही. आता आणखी एक खेळाडू सीरीजमधून बाहेर होण्याच्या उंबरठ्यावर आहे. मागच्या काही दिवसांपासून हा प्लेयर दुखापतीचा सामना करतोय.
कधी दुखापत झाली?
श्रेयस अय्यरनंतर ऑस्ट्रेलियाचा कॅमरुन ग्रीन पहिल्या कसोटीमधून बाहेर होऊ शकतो. ऑस्ट्रेलियाचा टेस्ट कॅप्टन पॅट कमिन्सनुसार, कॅमरुनच पहिल्या कसोटीत खेळणं कठीण दिसतय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कॅमरुन ग्रीन अजूनही आपल्या दुखापतीमधून सावरलेला नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यात त्याच्या हाताच्या बोटाला दुखापत झाली होती.
पॅट कमिन्सने दिली अपडेट
या महत्त्वाच्या टेस्ट सीरीजसाठी ऑस्ट्रेलियन टीम भारतात पोहोचलीय. बंगळुरुमध्ये त्यांनी प्रॅक्टिस सुरु केलीय. या दरम्यान पॅट कमिन्सने कॅमरुन ग्रीनच्या दुखापतीबद्दल अपडेट दिलीय. “कॅमरुन ग्रीन गोलंदाजी करु शकत नाही, हे मला माहित आहे. पुढचा आठवडा त्याच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. तो अजूनही पूर्ण क्षमतेने काही गोष्टी करत नाहीय. अशी दुखापत जेव्हा बरी होते, तेव्हा ती वेगात बरी होते. पुढच्या आठवड्यापर्यंत तो फिट होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. पुढच्या आठवड्यापर्यंत तो फिट झाला नाही, तर त्याला पहिल्या कसोटीत खेळता येणार नाही” असं पॅट कमिन्स फॉक्स स्पोर्ट्सवर म्हणाला.
महेश पिथियाच खास नेटमध्ये पाचारण
ऑस्ट्रेलियाने बंगळुरुमध्ये तयारी सुरु केलीय. पाहुण्या टीमच्या ट्रेनिंग सेशनमध्ये एक वेगळच दुश्य पहायला मिळालं. आर. अश्विनचा डुप्लीकेट स्टीव्ह स्मिथसह संपूर्ण ऑस्ट्रेलियन टीमला बॅटिंग प्रॅक्टिस देत होता. अश्विनसारखीच बॉलिंग Action असलेला गोलंदाज ऑस्ट्रेलियन टीमला प्रॅक्टिस देत होता. आर.अश्विनच्या या डुप्लीकेटच नाव आहे, महेश पिथिया. तो जूनागढचा आहे.
भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन टीम
पॅट कमिन्स (कॅप्टन), डेविड वॉर्नर, जॉश हेजलवूड, उस्मान ख्वाजा, स्टीवन स्मिथ, मार्नस लाबुशेन, ट्रॅविस हेड, कॅमरन ग्रीन, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, टॉड मर्फी, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, लांस मॉरिस, एश्टन एगर, मिचेल स्वेप्सन, नाथन लियोन, जॉश हेजलवुड, स्कॉट बोलँड.