IND vs AUS Test Series : आधी नागपूर त्यानंतर दिल्ली कसोटीत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव केला. दोन्ही कसोटी सामने टीम इंडियातने 3 दिवसात संपवले. दोन्ही टेस्ट मॅचेसमध्ये भारताच्या स्पिनर्सनी वर्चस्व गाजवलं. भारतीय फिरकी गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियन टीम टिकू शकली नाही. दोन्ही कसोटी सामने झटपट संपल्यामुळे ऑस्ट्रेलियन मीडिया आणि माजी क्रिकेटपटू भारताने टेस्ट मॅचसाठी बनवलेल्या पीचबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करत होते. आता या विषयात ICC चा निर्णय सुद्धा आला आहे.
या दोन्ही टेस्ट मॅचसाठी ICC चे रेफरी एंडी पायक्रॉफ्ट यांनी सरासरी रेटिंग दिली आहे. नागपूर आणि दिल्ली कसोटीसाठीचे पीच सरासरी असल्याच त्यांनी म्हटलय. म्हणजे टेस्ट मॅचसाठी ही विकेट खराब नव्हती. म्हणून दोन्ही वेन्यू विरुद्ध कुठलाही डिमॅरिट पॉइंट देण्यात येणार नाही. पीटीआयने हे वृत्त दिलं आहे.
डिमेरिट पॉइंट्स काय असतात?
ICC कडून पीच रेटिंगसाठी 6 स्तर निश्चित आहेत. यामध्ये कुठल्याही पीचला सरासरीपेक्षा कमी, खराब किंवा खेळण्यासाठी अनफिट रेटिंग मिळाल्यावर 1,3 आणि 5 डिमेरिट पॉइंट्स दिले जातात. हे डिमेरिट पॉइंट 5 वर्षांसाठी लागू होतात. कुठल्याही वेन्युला 5 किंवा त्यापेक्षा जास्त डिमॅरिट पॉइंट मिळाल्यास त्या वेन्युवर 1 वर्षासाठी आंतरराष्ट्रीय सामना आयोजित करता येत नाही.
त्याच विकेटवर भारताने केल्या 400 धावा
नागपूरमध्ये पहिला कसोटी सामना झाला. त्यामध्ये ऑस्ट्रेलियन टीमने पहिल्या इनिंगमध्ये 177 आणि दुसऱ्याडावात 91 धावा केल्या. टीम इंडियाने आपल्या पहिल्या डावात 400 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्याडावात एकाच सेशनमध्ये सर्व 10 विकेट गमावले.
अशी जिंकली दिल्ली कसोटी
दिल्लीमध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्याडावात चांगलं प्रदर्शन केलं. त्यांनी 263 रन्स केल्या. त्यांना 1 रन्सची निसटती आघाडी सुद्धा मिळाली. दुसऱ्याडावात चांगली सुरुवात केल्यानंतर तिसऱ्यादिवशी पहिल्या सेशनमध्ये 9 विकेट गमावले. फक्त 113 धावा त्यांनी केल्या. भारताने दिल्लीत तिसऱ्या दिवशी 6 विकेटने विजय मिळवला.