ढाका: टीम इंडिया बांग्लादेश दौऱ्यावर आहे. दोन्ही टीम्समध्ये तीन वनडे सामन्यांची सीरीज खेळली जाणार आहे. आज या सीरीजमधला पहिला सामना ढाका येथे सुरु आहे. T20 वर्ल्ड कपमधील निराशाजनक प्रदर्शनानंतर टीम इंडियाला आज कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहलीकडून भरपूर अपेक्षा होत्या. पण दोघांनी निराशा केली. रोहित शर्मा 31 चेंडूत 27 आणि विराट कोहली 15 चेंडूत 9 धावांवर आऊट झाला.
टॉप फिल्डिंगचा नमुना
विराट कोहली 11 व्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर आऊट झाला. त्याआधी याच ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर कॅप्टन रोहित शर्मा बोल्ड झाला होता. शाकीब अल हसन ही ओव्हर टाकत होता. विराट कोहली आऊट झाला, त्यावेळी बांग्लादेशकडून टॉप फिल्डिंगचा नमुना पहायला मिळला. स्वत: विराटलाही विश्वास बसला नाही. तो सुद्धा आऊट झाल्यानंतर पहात बसला.
Captain Litton Das takes a magnificent catch. #ViratKohli? #IndiavsBangladesh pic.twitter.com/t3VZUH1P2P
— Sharnam Monga (@SharnamMonga31) December 4, 2022
यावर विश्वास बसला नाही
बांग्लादेशचा कॅप्टन लिट्टन दासने शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला अप्रतिम कॅच घेतली. लिट्टनने उजव्या बाजूला डाइव्ह मारुन कॅच घेतली. एकप्रकारे हा विकेट त्याने बनवला. 11व्या ओव्हरमध्ये टीम इंडियाला लागोपाठ दोन झटके बसले. खुद्द विराटला सुद्धा तो बाद झालाय, यावर विश्वास बसला नाही.