ढाका: टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल पहिल्या टेस्ट मॅचआधी बरंच काही बोलला होता. पण 24 तासात त्यातला फोलपणा उघड झाला. पहिल्या टेस्टसाठी मैदानात उतरण्याआधी राहुलने इंग्लंडसारख आक्रमक क्रिकेट खेळणार असल्याचं म्हटलं होतं. त्याचे शब्द ऐकून क्रिकेटप्रेमी निश्चिच सुखावले. टॉस जिंकून पहिली फलंदाजी स्वीकारली, त्यावेळी आक्रमक विचारांची झलकही दिसली. पण त्यानंतर मैदानात मात्र बिलकुल याउलट चित्र होतं. केएल राहुल जसं बोलला होता, तसं बिलकुल खेळला नाही. केएल राहुल ज्या आक्रमकतेबद्दल बोलत होता, ती त्याच्या बॅटिंगमध्ये नाही, तर बांग्लादेशी गोलंदाज आणि खेळाडूंमध्ये दिसली.
शुभमन गिल आऊट झाला, आणि….
केएल राहुलने बांग्लादेश विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. शुभमन गिल सोबत पहिल्यांदा ओपनिंगसाठी उतरला. सर्वांना राहुलकडून आक्रमक बॅटिंगची अपेक्षा होती. पण गिलसोबतची जोडी तुटताच राहुलची फलंदाजी ढेपाळली.
विकेटवर टिकला पण उपयोग नाही
केएल राहुल क्लीन बोल्ड झाला. वेगवान गोलंदाज खालेद महमूदने त्याचा विकेट घेतला. बाद झाला, त्यावेळी राहुल 54 चेंडू खेळला होता. म्हणजे विकेटवर सेट झाल्यानंतर राहुलला चेंडूचा अंदाज आला नाही. त्याला पॅव्हेलियनमध्ये परताव लागलं.
ही कसली आक्रमकता?
केएल राहुल 22 रन्सवर बाद झाला. तो आक्रमक क्रिकेट खेळणार होता. त्याने 54 चेंडूत 3 चौकार लगावले. केएल राहुलच्या खेळात कुठेही आक्रमकता दिसली नाही. पण आऊट झाल्यानंर बॅटवर तो राग काढताना दिसला.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आक्रमक ब्रांडच क्रिकेट खेळावं लागेल, असं केएल राहुल म्हणाला होता. वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला बांग्लादेशवर क्लीन स्वीप विजय मिळवावा लागेल.