ढाका: टीम इंडियाने चटोग्राम कसोटी सामन्यात मोठा विजय मिळवला आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आज कसोटी सामन्याचा शेवटचा दिवस होता. कालच्या 6 बाद 272 वरुन आज बांग्लादेशने डाव पुढे सुरु केला. त्यांचे 4 विकेट बाकी होते. आज पाचव्या दिवशी स्कोर बोर्डवर फक्त 52 धावांची भर घालून बांग्लादेशचा डाव आटोपला. टीम इंडियाने बांग्लादेशला विजयासाठी 513 धावांच लक्ष्य दिलं होतं. बांग्लादेशची टीम 324 रन्सवर ऑलआऊट झाली. टीम इंडियाने 188 धावांनी मोठा विजय मिळवला.
कसोटीमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड कायम
चटोग्राम कसोटी जिंकून टीम इंडियाने बांग्लादेश विरुद्ध कसोटी फॉर्मेटमध्ये आपलं विजयी अभियान कायम ठेवलय. बांग्लादेशने अजूनपर्यंत कसोटीमध्ये भारतावर विजय मिळवलेला नाही. दोन्ही देशांमध्ये 12 कसोटी सामने खेळलेत. यात भारताने 10 सामने जिंकलेत. 2 कसोटी सामने ड्रॉ झालेत.
टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये स्थिती मजबूत
या विजयामुळे टीम इंडियाची WTC फायनलमध्ये खेळण्याची शक्यता वाढली आहे. टीम इंडियाला आता दुसरी कसोटी जिंकून 2-0 ने मालिका विजय मिळवावा लागेल. पहिला सामना जिंकून दमदार सुरुवात केलीय. भारताचे चट्टोग्राम कसोटी जिंकून 12 पॉइंट्स झालेत. टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंटस टेबलमध्ये स्थिती मजबूत झालीय.
WHAT. A. WIN! ??#TeamIndia put on an impressive show to win the first #BANvIND Test by 188 runs ??
Scorecard ▶️ https://t.co/CVZ44N7IRe pic.twitter.com/Xw9jFgtsnm
— BCCI (@BCCI) December 18, 2022
भारताने असं हरवलं बांग्लादेशला
टीम इंडिया आणि बांग्लादेशमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात काय झालं? त्यावर नजर टाकूया. भारताने पहिल्या डावात पुजारा आणि अक्षरच्या अर्धशतकाच्या बळावर 404 धावा केल्या. बांग्लादेशचा पहिला डाव 150 धावात आटोपला. भारताकडून पहिल्या डावात कुलदीपने 5 विकेट घेतल्या. टीम इंडियाने फॉलोऑन न देता पुन्हा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पुजारा आणि गिलच्या शतकाच्या बळावर भारताने दुसऱ्या इनिंगमध्ये 258 धावांवर डाव घोषित केला. बांग्लादेशला विजयासाठी 513 धावांच लक्ष्य दिलं. बांग्लादेशची टीम दुसऱ्या इनिंगमध्ये 324 धावांवर ऑलआऊट झाली. टीम इंडियाने 188 धावांनी सामना जिंकला.