ढाका: टीम इंडिया आणि बांग्लादेशमध्ये ढाकाच्या शेर-ए-बांग्ला नॅशनल स्टेडियमवर उद्यापासून दुसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 1-0 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाने चट्टोग्राममध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात बांग्लादेशला 188 धावांनी हरवलं होतं. टीम इंडिया पुन्हा एकदा या सामन्यात विजेतेपदाचा दावेदार म्हणून उतरणार आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये कुठल्या खेळाडूंना संधी मिळणार? हा मोठा प्रश्न आहे. टीम इंडिया खेळाडूंच्या दुखापतीचा सामना करतेय. आता यात केएल राहुलच्या नावाचा समावेश झालाय.
त्याच्या फिटनेसबद्दल साशंकता
बांग्लादेश दौऱ्याच्या सुरुवातीला टीम इंडियाला आपल्या प्रमुख खेळाडूंच्या फिटनेसमुळे काही झटके बसलेत. यात कॅप्टन रोहित शर्मा मोठं नाव आहे. वनडे सीरीजच्या दुसऱ्या सामन्यात रोहितच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तो मैदानाबाहेर निघून गेला. टेस्ट सीरीजला रोहित दुखापतीमुळे मुकणार आहे. रोहितच्या अनुपस्थितीत केएल राहुलकडे टीमच नेतृत्व आहे. पण त्याच्या फिटनेसबद्दल साशंकता निर्माण झालीय.
राहुलच्या जागी कोण?
राहुलला टीम इंडियाच्या प्रॅक्टिस सेशन दरम्यान हाताला दुखापत झाली होती. त्यामुळे दुसऱ्या टेस्टमध्ये त्याच्या खेळण्याविषयी साशंकता आहे. टीमचे बॅटिंग कोच विक्रम राठोड यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन दुखापत गंभीर नसल्याचं सांगितलं. राहुल फिट झाला नाही, तर चेतेश्वर पुजारा या कसोटीत टीम इंडियाच नेतृत्व करेल. कारण त्याला या सीरीजसाठी उपकर्णधार बनवण्यात आलय.
श्रीकर भरतला संधी का?
श्रीकर भरत हा दुसरा पर्याय आहे. टीम इंडियाच्या या बॅकअप विकेटकीपरने अजूनपर्यंत टेस्ट डेब्यु केलेला नाही. तो मीडिल ऑर्डरमध्ये बॅटिंग करतो. ऋषभ पंत टीममध्ये कायम राहिल. त्यामुळे भरतला विकेटकीपिंगची जबाबदारी मिळणार नाही.
ईश्वरन डेब्यु करणार?
28 वर्षाचा बंगालचा कॅप्टन अभिमन्यु ईश्वरन ओपनिंगला येतो. देशांतर्गत क्रिकेटपासून इंडिया ए साठी त्याने ओपनिंग केलीय. ईश्वरनने अजूनपर्यंत डेब्यु केलेला नाही. अलीकडेच बांग्लादेश ए विरुद्ध त्याने सलग दोन शतकं झळकवली. दोन मॅचच्या दोन इनिंगमध्ये ईश्वरनने 298 धावा केल्या. त्यामुळे ईश्वरनला पहिल्या कसोटीत संधी मिळू शकते.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
केएल राहुल (कॅप्टन)/ अभिमन्यु ईश्वरन, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज.