ढाका: टीम इंडियाने पहिल्या कसोटी सामन्यात धमाकेदार विजय मिळवला. तब्बल 188 धावांनी टीम इंडियाने ही कसोटी जिंकली. आता दुसरा कसोटी सामना 22 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. या कसोटी सामन्यात खेळण्यासाठी रोहित शर्मा फिट असल्याच वृत्त आलं होतं. रोहित शर्माला वनडे सीरीजच्या दुसऱ्या सामन्यात दुखापत झाली होती. त्याच्या अंगठ्याला बॉल लागला होता. त्याच्या अंगठ्याला टाके पडलेत. त्यामुळे रोहित तिसरी वनडे आणि पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकला नाही.
NCA च्या मेडीकल टीमकडून क्लियरन्स
रोहित शर्माला NCA च्या मेडीकल टीमकडून क्लियरन्स मिळाला असला, तरी तो दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार नाहीय. रोहित शर्मा रविवारी ढाक्याला रवाना होणार होता. पण आता तो ढाक्याला जाणार नाहीय. त्याऐवजी तो विश्रांती घेणार आहे.
पूर्णवेळ कॅप्टन म्हणून ही पहिली सीरीज
3 जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्ध सीरीज सुरु होतेय. उपकर्णधार के.एल.राहुल दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच नेतृत्व करणार आहे. पूर्णवेळ कॅप्टन म्हणून राहुलची ही पहिली सीरीज आहे. कसोटी मालिकेत टीम इंडिया 1-0 ने आघाडीवर आहे.
रोहित आता बॅटिंग करु शकतो
रोहित शर्माच्या अंगठ्याची अजून व्यवस्थित हालचाल होत नाहीय. ऑस्ट्रेलियाची सीरीज येत आहे. फिजियोला रोहितच्या बाबतीत कुठलाही धोका पत्करायचा नाहीय. टी 20 वर्ल्ड कपआधी जसप्रीत बुमराहच्या बाबतीत काय झालय, ते सर्वांना पाहिलय. रोहित आता बॅटिंग करु शकतो. पण फिल्डिंगच्यावेळी त्याची दुखापत बळावू शकते.
टीम सिलेक्शनची अडचण मिटली
रोहित शर्मा दुसऱ्या कसोटीत खेळणार नाहीय. त्यामुळे टीम सिलेक्शनची अडचणही मिटली आहे. रोहितच्या समावेशामुळे शुभमन गिल किंवा चेतेश्वर पुजाराला बाहेर बसवाव लागलं असतं. दोघांनी पहिल्या कसोटीत शतक झळकावलय. आता रोहित खेळणार नसल्याने दुसऱ्या कसोटीत विनिंग टीम कायम राहिल.