Ishan kishan 200: 131 चेंडूत 210 धवा कुटूनही इशान किशनला एका गोष्टीची खंत

| Updated on: Dec 11, 2022 | 10:51 AM

Ishan kishan 200: आयुष्यात टार्गेट असावं, तर असं, तुम्ही सुद्धा म्हणाल....

Ishan kishan 200: 131 चेंडूत 210 धवा कुटूनही इशान किशनला एका गोष्टीची खंत
Follow us on

ढाका: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिलं शतक ठोकल्यानंतर कुठल्याही फलंदाजाला आनंद होणं स्वाभाविक आहे. तेच शतक त्याने द्विशतकात बदललं, तर आनंद द्विगुणित होतो. टीम इंडियाचा युवा फलंदाज इशान किशन सध्या आनंदात आहे. त्याने वनडे क्रिकेटमध्ये फक्त आपलं पहिल शतकच ठोकलं नाही, तर वर्ल्ड रेकॉर्डसह डबल सेंच्युरी झळकवली. इशानच्या द्विशतकामुळे टीम इंडिया विजयी झाली, पण त्याचवेळी इशानला एका गोष्टीची खंत सुद्धा आहे.

इशानने नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड

इशानच्या धुवाधार फलंदाजीमुळे 10 डिसेंबरची तारीख भारतीय क्रिकेट इतिहासात कायमस्वरुपी लक्षात राहील. बांग्लादेश विरुद्ध तिसऱ्या वनडेत चट्टोग्रामच्या मैदानात या फलंदाजाने 131 चेंडूत 210 धावा चोपल्या. इशानने वेगवान द्विशतक झळकावण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला. दीड वर्षापूर्वीच डेब्यु करणाऱ्या इशानच हे पहिलच शतक आहे.

या गोष्टीची खंत

इशान ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता, ते पाहून वनडे क्रिकेटमध्ये तो त्रिशतक झळकवणारा पहिला फलंदाज बनणार, असं वाटत होतं. तो बाद झाला, तेव्हा 36 ओव्हर झाल्या होत्या. 84 चेंडू बाकी होते. तो हा विक्रम करु शकला असता. शानदार फलंदाजी करणाऱ्या इशानला या गोष्टीची खंत आहे.

“मी आऊट झालो तेव्हा, 15 ओव्हर बाकी होत्या. माझ्याकडे 300 धावा करण्याची संधी होती” असं इशान किशन म्हणाला.

इशानने किती चौकार-षटकार मारले?

इशानने आपल्या इनिंगमध्ये 24 चौकार आणि 10 षटकार लगावले. त्याचा हा 10 वा आंतरराष्ट्रीय सामना होता. त्याने कमी वयात डबल सेंच्युरीचा रेकॉर्ड बनवला. इशानच्या या इनिंगच्या बळावर भारताने बांग्लादेशसमोर 409 धावांच डोंगराएवढ लक्ष्य ठेवलं.

दिग्गजांच्या क्लबमध्ये प्रवेश

इशान वनडे क्रिकेटमध्ये दुहेरी शतक झळकवणारा चौथा भारतीय फलंदाज बनला आहे. सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मा या दिग्गजांच्या क्लबमध्ये त्याने प्रवेश केलाय. “अशा दिग्गजांच्या पंक्तीत नाव जोडलं गेल्याने मी आनंदी आहे. ही विकेट फलंदाजांसाठी चांगली होती. खराब चेंडूवर प्रहार करण्याची माझी रणनिती होती” असं इशान म्हणाला.