ढाका: टीम इंडिया आणि बांग्लादेशमध्ये चट्टोग्राम येथे टेस्ट सीरीजचा पहिला सामना सुरु आहे. कसोटीच्या दुसऱ्यादिवस अखेरी टीम इंडिया मजबूत स्थितीमध्ये आहे. टीम इंडियाच्या या प्रदर्शनाने हेड कोच राहुल द्रविड यांना निश्चित आनंद झाला असेल. या दरम्यान राहुल द्रविड यांना एक मेसेज मिळालाय. त्याचं त्यांना देखील आश्चर्य वाटलं असेल. बांग्लादेशचे गोलंदाजी कोच अॅलन डोनाल्ड यांनी हा मेसेज पाठवलाय. त्यांनी राहुल द्रविड यांची माफी मागितलीय.
25 वर्षांपूर्वी घडली होती घटना
बांग्लादेशचे गोलंदाजी कोच दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज वेगवान गोलंदाज होते. डोनाल्डच्या धारदार वेगवान गोलंदाजीसमोर फलंदाजांना धडकी भरायची. फक्त गोलंदाजीच नाही. आपल्या आक्रमक वर्तनामुळे ते अनेकदा प्रतिस्पर्धी टीममधील खेळाडूंना भिडायचे. अशीच एक घटना 25 वर्षांपूर्वी भारताविरुद्धच्या सामन्यात घडली होती. राहुल द्रविड बरोबर वाद झाला होता.
कुठे घडली होती ही वाईट घटना?
25 वर्षापूर्वीच आपलं वर्तन आठवून डोनाल्ड यांनी द्रविड यांची माफी मागितलीय. भारताविरुद्धच्या त्या सामन्यात मी मर्यादा ओलांडली होती. डोनाल्ड म्हणाले की, “डरबनमध्ये ही वाईट घटना घडली होती. ज्याबद्दल मला बोलायचं नाही. द्रविड आणि सचिन तेंडुलकर हे आमच्या गोलंदाजांची धुलाई करत होते. माझ्या मनात राहुल द्रविड यांच्याबद्दल आदर आहे. राहुल यांना भेटून त्या दिवसाच्या वर्तनाबद्दल मला सॉरी बोलायचय”
डोनाल्ड काय म्हणाले?
“आपल्या त्या कृतीमुळे राहुल द्रविड़ यांचा विकेट जरुर मिळाला. पण त्या प्रकाराबद्दल आजही मनात पश्चातापाची भावना आहे. मला काहीतरी मूर्खासारखं करायच होतं. मला त्यांची विकेट जरुर मिळाली. त्या दिवशी मी जे बोललो, त्यासाठी मला राहुल द्रविड यांची माफी मागयचीय. तो खूप चांगला माणूस आहे. राहुल तू व्हिडिओ बघत असशील, तर मला तुला भेटण्याची इच्छा आहे” असं डोनाल्ड म्हणाला.
????????????? ?? ??? ????! ?
? | Bangladesh’s bowling coach Allan Donald sends out a special message to India’s head coach Rahul Dravid ?
P.S. The end will certainly bring a smile to your face ?#AllanDonald #RahulDravid #SonySportsNetwork pic.twitter.com/UgYy5QGf5e
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) December 14, 2022
द्रविड यांना विनंती मान्य
भारताचे हेड कोच राहुल द्रविड यांना, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हसायला आलं. “हा सर्व खेळाडा भाग आहे. डोनाल्डला यासाठी माफी मागण्याची गरज नाही. द्रविड यांनी सुद्धा डोनाल्ड यांचं कौतुक केलं. तो बिल भरणार असेल, तर मलाही डोनाल्ड सोबत डिनरला जायला आवडेल” असं द्रविड मस्करीत म्हणाले.