नवी दिल्ली: ऋषभ पंत पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडिया आणि बांग्लादेशमध्ये 2 सामन्यांची कसोटी मालिका 14 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप लक्षात घेता, टीम इंडियासाठी ही सीरीज महत्त्वाची आहे. ऋषभ पंत सुद्धा या सीरीजमध्ये खेळणार आहे. ऋषभ पंत आधी वनडे टीमचा भाग होता. पण सीरीजआधी त्याला दुखापत झाली. बीसीसीआयकडून ही माहिती देण्यात आली. पण नंतर बातमी आली की, ऋषभ पंतने मॅनेजमेंटकडे आराम मागितलाय. बोर्डाकडून यावर काही सांगण्यात आलं नाही. पंतचा सध्याचा फॉर्म खराब आहे. सातत्याने त्याच्यावर टीका होतेय.
त्याचंच टीममधील स्थान पक्क नाहीय, मग….
टीम इंडियाने इंग्लंड विरुद्ध आपला शेवटचा कसोटी सामना खेळला होता. रोहित शर्मा दुखापतीमुळे त्यावेळी टीममध्ये नव्हता. जसप्रीत बुमराहने नेतृत्व केलं होतं. ऋषभ पंत उपकर्णधार होता. बांग्लादेश विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यातही रोहित शर्मा नाहीय. केएल राहुल टीमच नेतृत्व करतोय. चेतेश्वर पुजारा उपकर्णधार आहे. पुजाराच कसोटी संघातील स्थान पक्क नाहीय. त्याच आत-बाहेर होणं सुरु असतं. दुसऱ्याबाजूला पंतने टीम इंडियाच नेतृत्व केलय.
बोर्डाचा विश्वास गमावला?
ऋषभ पंतला उपकर्णधार पदावरुन हटवण्यात आल्याने अनेक फॅन्स हैराण आहेत. या युवा क्रिकेटरने आता बोर्डाचा विश्वास गमावलाय का? असा प्रश्न विचारला जातोय. पंतची कसोटीमधील कामगिरी खूपच चांगली आहे. ऑस्ट्रेलियाशिवाय इंग्लंडमधील विजयात त्याने योगदान दिलय. त्याने आतापर्यंत 31 टेस्टमध्ये 43 च्या सरासरीने 2123 धावा केल्या आहेत. यात 5 शतक आणि 10 अर्धशतकं आहेत. तो नाबाद 159 धावांची इनिंग खेळलाय. त्याचा स्ट्राइक रेट 73 चा आहे.
20 धावाही नाही करता आल्या
ऋषभ पंतला न्यूझीलंड विरुद्ध टी 20 आणि वनडे सीरीजमध्ये संधी मिळाली. पण तो कुठल्याही सामन्यात साधी 20 धावांची इनिंग खेळू शकला नाही. टी 20 मध्ये त्याने 6 आणि 11, वनडेमध्ये 15 आणि 10 धावा केल्या. एकवेळ केएल राहुलसोबत कॅप्टनशिपच्या रेसमध्ये होता. पण पंत आता त्यामध्ये मागे पडतोय. पंतने 5 टी 20 इंटरनॅशनल सामन्यात टीम इंडियाच नेतृत्व केलय. 2 सामन्यात विजय मिळाला. 2 सामन्यात पराभव झाला. एका मॅचचा रिजल्ट लागला नाही.