पर्थ: ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाला झटका बसला आहे. कालच दक्षिण आफ्रिकेकडून टीम इंडियाचा वर्ल्ड कपमध्ये पहिला पराभव झाला. सेमीफायनल गाठण्यासाठी टीम इंडियाला पुढचे सामने जिंकण आवश्यक आहे. मात्र त्याआधी टीमला एक झटका बसला आहे. टीम इंडियाचा पुढचा सामना बांग्लादेश विरुद्ध होणार आहे. एडलेडमध्ये ही मॅच होईल.
य दुखापत झालीय?
या सामन्यात टीम इंडियाला विजय मिळवणं आवश्यक आहे. या मॅचमध्ये दिनेश कार्तिक खेळणार नाहीय. त्याच्या लोअर बॅकला दुखापत झालीय. त्याच्याजागी विकेटकीपर ऋषभ पंतच खेळणं निश्चित आहे. काल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना दिनेश कार्तिकला दुखापत झाली होती.
ऋषभ पहिल्यांदा मैदानात उतरला
रविवारी सामना सुरु असताना दिनेश कार्तिकने दुखापतीमुळे मैदान सोडलं. त्याच्याजागी ऋषभ पंत विकेटकिपींगसाठी मैदानात उतरला. टी 20 वर्ल्ड कपमध्ये ऋषभने पहिल्यांदा ग्लोव्हज हातात घातले.
बीसीसीआयकडून स्टेटमेंट नाही
“दिनेश कार्तिकला पाठिची समस्या झाली. मॅचनंतर आम्ही भेटलो नाही. हॉटेलवर गेल्यानंतर मी त्याच्याशी बोलीन. फिजियोच्या रिपोर्टची आम्ही वाट पाहतोय” असं भुवनेश्वर कुमार मॅचनंतर प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणाला. दिनेश कार्तिकच्या दुखापतीबद्दल अजून बीसीसीआयकडून अधिकृत स्टेटमेंट आलेलं नाही.
दिनेश कार्तिककडून अपेक्षाभंग
कालच्या सामन्याला टीमला गरज असताना दिनेश कार्तिक बॅटने कमाल दाखवू शकला नाही. त्याने 15 चेंडूत 6 धावा केल्या. सूर्यकुमारसोबत मिळून त्याने डाव सावरला. पण त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा त्याने पूर्ण केल्या नाहीत. कालच्या मॅचमध्ये त्याने 15-20 जास्त केल्या असत्या, तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा लागला असता.
शेवटपर्यंत झुंजवलं
टीम इंडियाने काल पहिली फलंदाजी केली. त्याने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 134 धावांच लक्ष्य दिलं होतं. आफ्रिकेने पाच विकेट राखून विजय मिळवला. पण त्यांना सहजासहजी लक्ष्य गाठता आलं नाही. पर्थच्या विकेटवर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. दक्षिण आफ्रिकन टीमला शेवटच्या ओव्हरपर्यंत विजयासाठी झुंजवलं.