ब्रिस्बेन: टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये टीम इंडियाचा बुधवारी चौथा सामना होणार आहे. बांग्लादेश विरुद्ध ही मॅच आहे. भारत आणि बांग्लादेश दोन्ही टीम्ससाठी ही मॅच महत्त्वाची आहे. टी 20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी दोन्ही टीम्सना विजय आवश्यक आहे. ग्रुप 2 मध्ये टीम इंडिया दुसऱ्या आणि बांग्लादेश तिसऱ्या स्थानावर आहे. या मॅचमधील विजेता संघ ग्रुपमध्ये टॉपवर जाईल. टीम इंडिया या मॅचसाठी पूर्णपणे सज्ज आहे. बांग्लादेश विरुद्ध टीम इंडिया नवीन प्लेइंग 11 सह मैदानात उतरू शकते.
हा प्रयोग यशस्वी ठरला नाही
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाने एक बदल केला होता. अक्षर पटेलच्या जागी दीपक हुड्डाचा टीममध्ये समावेश केला होता. हा प्रयोग यशस्वी ठरला नाही. दक्षिण आफ्रिकेकडून टीम इंडियाचा पराभव झाला. वर्ल्ड कपमधला टीमची ही पहिली हार आहे. बांग्लादेश विरुद्ध टीम इंडिया नव्या प्लेइंग 11 सह मैदानात उतरु शकते. हे बदल काय असू शकतात? ते समजून घेऊया.
टीम इंडियामध्ये 2 बदल शक्य
मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडिया बांग्लादेश विरुद्ध दोन बदलांसह उतरु शकते. दीपक हुड्डाला पुन्हा वगळलं जाईल. त्याच्याजागी अक्षर पटेलचा टीममध्ये समावेश होऊ शकतो. ऋषभ पंतच प्लेइंग 11 मध्ये समावेश होऊ शकतो. ऋषभ पंत या टी 20 वर्ल्ड कपमध्ये अजूनपर्यंत एकही सामना खेळलेला नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दिनेश कार्तिकला दुखापत झाली होती. त्याला बांग्लादेश विरुद्ध विश्रांती दिली जाऊ शकते.
केएल राहुलच काय होणार?
टी 20 वर्ल्ड कपच्या तिन्ही सामन्यात केएल राहुल बॅटने अपयशी ठरलाय. पण तरीही टीममधील त्याच्या स्थानाला धोका नाही. हेड कोच राहुल द्रविड यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये केएल राहुलच्या पाठिशी असल्याचं सांगितलं. केएल राहुल पाकिस्तान विरुद्ध 4, नेदरलँडस विरुद्ध 9 आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 9 धावांवर बाद झाला.
अश्विनच्या जागी चहलला संधी?
अश्विनच्या जागी युजवेंद्र चहलला संधी मिळणार का? हा प्रश्न आहे. मागच्या सामन्यात अश्विन महागडा गोलंदाज ठरला होता. युजवेंद्र चहल अजूनपर्यंत एकही सामना खेळलेला नाही. चहलला टीममध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. युजवेंद्र चहल, दीपक हु्ड्डा, दिनेश कार्तिक आणि हर्षल पटेल हे प्लेइंग 11 बाहेरच असतील.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन- रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, आर अश्विन, अर्शदीप सिंह आणि मोहम्मद शमी.