ढाका: टीम इंडिया आणि बांग्लादेशमध्ये दुसरा वनडे सामना बुधवारी ढाका येथे होणार आहे. टीम इंडिया सीरीजमध्ये 1-0 ने मागे आहे. पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा एक विकेटने पराभव झाला. आता टीम इंडिया कुठल्या प्लेइंग 11 सह मैदानात उतरणार हा प्रश्न आहे. टीम इंडियाच्या गोटातून माहिती समोर आलीय. त्यांचा एक खेळाडू दुखापतग्रस्त आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार शार्दुल ठाकूरला दुखापत झालीय. त्यामुळे त्याचं दुसऱ्या वनडेत खेळणं निश्चित नाहीय. टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हवनमध्ये बदल निश्चित मानला जातोय. कुठल्या खेळाडूची टीममध्ये एंट्री होऊ शकते, कोण बाहेर होणार? जाणून घ्या.
‘या’ दोघांना मिळू शकते संधी
मीडिया रिपोर्ट्सनुसार शार्दुल ठाकूर फिट नाहीय. त्याच्याजागी उमरान मलिकला संधी मिळू शकते. पहिल्या वनडेसाठी अनफिट ठरलेल्या अक्षर पटेलला सुद्धा दुसऱ्या वनडेमध्ये संधी मिळू शकते. शाहबाज अहमदच्या जागी तो खेळू शकतो. मंगळवारी टीम प्रॅक्टिस आणि मॅचच्याआधी शार्दुल-अक्षर पटेलबद्दल निर्णय होईल.
बेंचवर कोण बसणार?
पुन्हा एकदा केएल राहुलकडेच विकेटकिपिंगची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. त्यामुळे इशान किशनला पुन्हा बेंचवरच बसाव लागेल. इशान किशन फलंदाज म्हणूनही खेळू शकतो. पण शिखर धवनला आणखी संधी मिळणार आहे. केएल राहुल आणि श्रेयस अय्यरच खेळणं निश्चित आहे. दोघांच्या फलंदाजीच्या क्रमवारीत बदल होऊ शकतो.
वेगवान गोलंदाजांमध्ये कोणाला संधी मिळेल?
वेगवान गोलंदाजांमध्ये कुलदीप सेनला आणखी एक संधी मिळू शकते. पहिल्या वनडेत कुलदीप महागडा गोलंदाज ठरला होता. त्याला आणखी एक संधी मिळू शकते. दीपक चाहर आणि मोहम्मद सिराजच खेळणही निश्चित मानलं जातय.
India Probable Playing XI: रोहित शर्मा, (कॅप्टन) शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, वॉशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद/अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर/उमरान मलिक, दीपक चाहर, मोहम्मद सिराज आणि कुलदीप सेन.