ढाका: क्रिकेटमध्ये तुम्ही अनेक सामने पाहिले असतील. त्या सामन्यात तुम्ही कॅचेस सुद्धा पाहिल्या असतील. काही सोप्या तर काही कठीण कॅचेस असतात. आज बांग्लादेश विरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात शिखर धवनने एक अनोखी कॅच पकडली. ही कॅच हाताने कमी आणि पायाने जास्त पकडली गेली. आता पायाने कोणी कॅच पकडतो का?. पण शिखर धवनचा अंदाजच वेगळा आहे. क्रिकेटच्या मैदानात शिखर धवन अनेकदा वेगळ्या गोष्टी करतो. मीरपूर येथे दुसरा वनडे सामना सुरु आहे. या मॅचमध्ये त्याने शाकीब अल हसनची एकदम वेगळ्याच पद्धतीने कॅच पकडली.
17 व्या ओव्हरमध्ये घेतली ही अजब-गजब कॅच
शिखर धवनने आज दोन कॅच पकडल्या. शाकीब आणि रहीमची कॅच त्याने घेतली. मीरपूर येथे दुसऱ्या वनडेत बांग्लादेशच्या इनिंगची 17 वी ओव्हर सुरु होती. भारताकडून वॉशिंग्टन सुंदर ही ओव्हर टाकत होता. त्याच्या षटकातील शेवटचा चेंडू होता. चेंडू शाकीबच्या बॅटच्या कडेला लागून हवेत उडाला. चेंडू फाइन लेगला गेला. झेल घेण्यासाठी धवन आणि सिराज दोघे पुढे आले. दोघे परस्परांना धडकतील, असं एकवेळ वाटलं. पण असं घडलं नाही.
अशी घेतली कॅच
कॅच पकडण्यासाठी शिखर धवन चेंडूच्या खाली आला. पण चेंडू त्याच्या हातातून निसटला. थेट चेंडू पायापर्यंत गेला. पण सुदैवाने धवनने पायामधून चेंडू सोडला नाही. अशाप्रकारे शाकीब आऊट झाला.
वॉशिंग्टन सुंदर जमिनीवर झोपला
शिखर धवन शाकीब अल हसनचा हा कॅच पकडत असताना, ते दृश्य पाहण्यासाठी वॉशिंग्टन सुंदर जमिनीवर झोपला. कॅच पकडणार की, नाही हा त्याला डाऊट होता. सिराज आणि धवन आपसात धडकतील, अशी त्याला भिती होती.
Funny catch by Shikhar Dhawan….
Tal thok ke..??#ShikharDhawan #indvsbang #siraj #UmranMalik #washingtonsundar #RohitSharma #ViratKohli #IndianCricketTeam pic.twitter.com/5vJe6tUftY— Nikesh Gohite?? (@nikesh_gohite) December 7, 2022
शाकीबनंतर रहीमचा झेल
शाकीबचा विकेट काढल्यानंतर वॉशिंग्टनने पुढच्याच ओव्हरमध्ये रहीमला सुद्धा पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. बांग्लादेशच्या इनिंगमध्ये 19 व्या ओव्हरमध्ये धवनने ही कॅच घेतली.