IND vs BAN: Virat Kohli वर चीटिंगचा आरोप, अंपायरनी पकडल्यास पराभूत झाली असती टीम इंडिया

| Updated on: Nov 03, 2022 | 9:35 AM

IND vs BAN: Virat Kohli वर चीटिंगचा जो आरोप होतोय, तो प्रकार नेमका कुठल्या ओव्हरमध्ये घडला? आणि नेमकं काय झालं?

IND vs BAN: Virat Kohli वर चीटिंगचा आरोप, अंपायरनी पकडल्यास पराभूत झाली असती टीम इंडिया
Virat-Kohli
Image Credit source: AFP
Follow us on

एडिलेड: T20 वर्ल्ड कप 2022 मध्ये टीम इंडियाने महत्त्वाच्या सामन्यात बांग्लादेशर विजय मिळवला. एडिलेड ओव्हलच्या मैदानात झालेला हा सामना टीम इंडियाने 5 रन्सनी जिंकला. सेमीफायनल प्रवेशासाठी टीम इंडियाला या मॅचमध्ये विजय मिळवणं आवश्यक होतं. टीम इंडियाने हा सामना फक्त 5 रन्सनी जिंकला. तुम्हाला माहित आहे का? विजयाच हेच अंतर पराभवाच कारण बनू शकलं असतं.

….तर कदाचित सामन्याचा दुसरा निकाल असता

विराट कोहलीवर बांग्लादेश टीममधील एका खेळाडूने मैदानात चीटिंग केल्याचा आरोप केला आहे. ही चीटिंग पकडली गेली असती, तर कदाचित सामन्याचा दुसरा निकाल असता, असं या खेळाडूचं म्हणणं आहे. मॅचनंतर नुरुल हसनने प्रेस कॉ़न्फरन्समध्ये विराट कोहलीने मैदानात चीटिंग केल्याचा आरोप केला.

नुरुल हसनच म्हणण काय?

नुरुल हसनने विराट कोहलीवर मैदानात फेक फिल्डिंग केल्याचा आरोप केला आहे. मैदानावरील ऑनफिल्ड अंपायर सुद्धा ही फेक फिल्डिंग पकडू शकले नाहीत. विराट कोहलीची ती चीटिंग पकडली असती, तर पेनल्टी म्हणून बांग्लादेशच्या खात्यात 5 रन्स जमा झाले असते, असा नुरुल हसनचा दावा आहे.

नेमकं कुठल्या ओव्हरमध्ये काय घडलं?

विराट कोहलीवर चीटिंगचा जो आरोप होतोय, तो प्रकार नेमका कुठल्या ओव्हरमध्ये घडला, ते जाणून घेऊया. बांग्लादेशच्या इनिंगमध्ये 7 व्या ओव्हरमध्ये मैदानात हा प्रकार घडला. अक्षर पटेल त्यावेळी गोलंदाजी करत होता. त्याच्या गोलंदाजीवर लिट्टन दासने डीप ऑफ साइडला शॉट मारला. याच ओव्हरमध्ये कोहलीवर फेक फिल्डिंगचा आरोप आहे.

म्हणून कुठलीही कारवाई झाली नाही

मैदानावरील ऑनफिल्ड अंपायर एरासमस आणि क्रिस ब्राऊन दोघांनाही ही चीटिंग पकडता आली नाही, असं बांग्लादेशी खेळाडूच म्हणण आहे. मैदानावरील बांग्लादेशी फलंदाजांच्या सुद्धा ही गोष्ट लक्षात आली नाही. त्यामुळे या विषयात कुठलीही कारवाई झाली नाही.

नुरुल हसन काय म्हणाला?

नुरुल हसनने प्रेस कॉन्फरन्समध्ये पत्रकारांशी वार्तालाप करताना विराट कोहलीच्या फेक फिल्डिंगकडे लक्ष वेधलं. “विराट कोहलीने फेक थ्रो केला होता. त्यासाठी त्याच्यावर 5 रन्सची पेनल्टी लागली असती. असं झालं असतं, तर मॅच आम्ही जिंकलो असतो. पण दुर्भाग्याने असं घडलं नाही” असं नुरुल हसन म्हणाला.

क्रिकेटचा नियम काय सांगतो?

क्रिकेटचा नियम 41.5 नुसार, “मैदानात फेक फिल्डिंग किंवा कुठलीही अशी कृती जी खेळ नियमांच्या विरुद्ध असेल, त्यावर अंपायर तो चेंडू डेड बॉल देऊ शकतात किंवा 5 रन्सची पेनल्टी लावू शकतात” आयसीसीच्या नियमांमध्ये तशी तरतूद आहे.

या पराभवानंतर बांग्लादेशच्या सेमीफायनलच्या अपेक्षा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. काही धक्कादायक निकाल लागले, तरच बांग्लादेशची टीम सेमीफायनलमध्ये पोहोचू शकते. पण असं घडणं खूप कठीण आहे.