मुंबई: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) मध्ये आजपासून तीन वनडे सामन्यांची मालिका (ODI Series) सुरु होत आहे. आज ओव्हल (Oval) मध्ये पहिला सामना होणार आहे. टी 20 सीरीज मधल्या शानदार विजयामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास उंचावला आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाचा इरादा आजचा सामना जिंकून विजयी प्रारंभ करण्याचा असेल. यजमान इंग्लंडचा संघ नेदरलँड विरुद्ध शेवटची वनडे सीरीज खेळला होता. 3-0 ने त्यांनी ही मालिका जिंकली होती. या सीरीजच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने 498 धावांचा विश्वविक्रम केला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वाधिक धावसंख्या आहे. भारतीय संघाने यंदाच्यावर्षी दोन वनडे सीरीज खेळल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेतील वनडे मालिकेत भारताचा 3-0 ने पराभव झाला. त्यानंतर मायदेशात झालेल्या मालिकेत भारताने वेस्ट इंडिजला 3-0 असं पराभूत केलं.
या सीरीज साठी भारत आणि इंग्लंडचे मजबूत संघ मैदानात उतरणार आहेत. इंग्लंडच्या संघात फॉर्म मध्ये असलेले जॉनी बेयरस्टो, ज्यो रुट आणि बेन स्टोक्स हे खेळाडू असतील. भारतीय संघात शिखर धवन, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी दिसतील.
शिखर धवन संघात परतल्याने ओपनिंग मध्ये बदल दिसून येईल. शिखर धवन रोहित शर्मासोबत सलामीला येईल. विराट कोहली ग्रोइन इंजरीमुळे सलामीच्या सामन्यात खेळण्याची शक्यता नाहीय. विराट कोहली खेळला नाही, तर त्याच्याजागी इशान किशनला संधी मिळू शकते. शार्दुल ठाकूर आणि प्रसिद्ध कृष्णा यापैकी एकाला संधी मिळू शकते.
रोहित शर्मा (कॅप्टन), शिखर धवन, इशान किशन, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा/शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल
जोस बटलर (कॅप्टन), जॉनी बेयरस्टो, ज्यो रुट, लियान लिव्हिंगस्टोन, बेन स्टोक्स, जेसन रॉय, मोइन अली, सॅम करण, डेविड विली, मॅथ्यू पार्किंसन, रीस टॉप्ली,