हैदराबाद | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीतील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. टीम इंडियाने खेळ संपेपर्यंत 1 विकेट गमावून 119 धावा केल्या आहेत. यशस्वी जयस्वाल 76 आणि शुबमन गिल 14 धावांवर नाबाद परतले. तर कॅप्टन रोहित शर्मा 24 धावा करुन आऊट झाला. टीम इंडिया अजून 127 धावांनी पिछाडीवर आहे. इंग्लंडने पहिल्या डावात 246 धावा केल्या. टीम इंडिया 127 धावांनी पिछाडीवर असली, तरीही टीम इंडियाच्या नावावर हा पहिला दिवस राहिला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
खेळ संपला तोवर यशस्वी जयस्वाल याने 70 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 9 चौकारांच्या मदतीने नाबाद 76 धावा केल्या. तर शुबमन गिल 43 चेंडूंचा सामना करुन 14 धावांवर नाबाद आहे. तर रोहित शर्मा 24 धावा करुन माघारी परतला. त्याआधी इंग्लंडने कॅप्टन बेन स्टोक्स याच्या 70 धावांच्या जोरावर पहिल्या डावात 70 धावांची खेळी केली. तर बेन डकेट याने 35 आणि जॉनी बेरिस्टो याने 37 धावांचं योगदान दिलं. तर टीम इंडियाकडून रवींद्र जडेजा आणि आर अश्विन या दोघांनी 3-3 विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल या दोघांनी 2-2 विकेट्स घेत इंग्लंडला गुंडाळलं.
दरम्यान पहिल्या दिवशी अनेक विक्रम झाले. टीम इंडियाचा केएल राहुल याचा हा 50 वा कसोटी सामना ठरला. तसेच अनिल कुंबळे आणि हरभजन सिंह या जोडीला मागे टाकत आर अश्विन आणि रवींद्र जडेजा ही जोडी टीम इंडियासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारी ठरली. या दोघांनी आतापर्यंत 502 पेक्षा जास्त विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे.
पहिल्या दिवसाचा खेळ संपला
Stumps on the opening day in Hyderabad! 🏟️
An eventful day with the bat and the ball 😎#TeamIndia move to 119/1, trail by 127 runs 👏
Scorecard ▶️ https://t.co/HGTxXf8b1E#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/iREFqMaXqS
— BCCI (@BCCI) January 25, 2024
पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फॉक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, मार्क वुड, टॉम हार्टले आणि जॅक लीच.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, श्रीकर भारत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.