IND vs ENG: हिटमॅनचा तडाखा कायम, कांगारुंनंतर इंग्लंड विरुद्ध अर्धशतक

| Updated on: Jun 27, 2024 | 11:57 PM

Rohit Sharma Fifty: टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने इंग्लंड विरुद्ध टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील दुसर्‍या उपांत्य सामन्यात अर्धशतक ठोकलं आहे.

IND vs ENG: हिटमॅनचा तडाखा कायम, कांगारुंनंतर इंग्लंड विरुद्ध अर्धशतक
Rohit sharma fifty ind vs eng
Follow us on

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात इंग्लंड विरुद्ध शानदार अर्धशतक ठोकलं आहे. रोहितने टीम इंडियाच्या डावामधील 13 व्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर खणखणीत सिक्स ठोकून अर्धशतक पूर्ण केलं. रोहितचं हे या स्पर्धेतील सलग दुसरं आणि टी20I कारकीर्दीतील 32 वं अर्धशतक ठरलं. रोहितने याआधीच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध अर्धशतक झळकावलं होतं.

रोहितने सॅम करनच्या ओव्हरमध्ये मोठे फटके मारले. सॅमच्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर रोहितने अप्रतिम सिक्स मारला आणि अर्धशतक पूर्ण केलं. रोहितने अवघ्या 36 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 55 धावा केल्या. रोहितने या दरम्यान 152.78 च्या स्ट्राईक रेटने ही फिफ्टी पूर्ण केली. रोहितकडून या अर्धशतकानंतर मोठी खेळी अपेक्षित होती. मात्र अवघ्या 3 बॉलनंतरच रोहित आऊट झाला. त्यामुळे मैदानात एकच शांतता पसरली. आदिल राशिदने डावातील 14 व्या ओव्हरमध्ये रोहितला आऊट केलं. राशिदच्या चौथ्या बॉलवर फटका मारण्याच्या नादात रोहितचा अंदाज चुकला आणि बोल्ड झाला. रोहितने 39 बॉलमध्ये 6 चौकार आणि 2 सिक्ससह 146.15 च्या स्ट्राईक रेट ने 57 धावा केल्या.

रोहित शर्माचं 32 वं टी20I अर्धशतक

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह.

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), फिलिप सॉल्ट, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि रीस टोपले.