विशाखापट्टणम | टीम इंडियाचा इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील पहिला डाव हा दुसऱ्या दिवशी झटपट आटोपला आहे. टीम इंडियाने 112 ओव्हरमध्ये ऑलआऊट 396 धावा केल्या. टीम इंडियाला दुसऱ्या दिवशी 4 विकेट्सच्या मोबदल्यात 19 ओव्हरमध्ये 60 धावा केल्या. टीम इंडियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 93 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 336 धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आर अश्विन आणि यशस्वी जयस्वाल ही जोडी मैदानात आली. या दोघांनी टीम इंडियाचा स्कोअरकार्ड हलता ठेवला. मात्र त्यानंतर आर अश्विन 20 धावांवर आऊट झाला. यशस्वीनंतर कुलदीप यादव मैदानात आला.
दुसऱ्या बाजूला यशस्वी जयस्वाल द्विशतकाच्या उंबरठ्यावर होता. यशस्वीने बशीर अहमद याच्या बॉलिंगवर सिक्स आणि फोर ठोकत पहिलंवहिलं द्विशतक पूर्ण केलं. मात्र यशस्वी द्विशतकानंतर फार वेळ मैदानात राहू शकला नाही. यशस्वी 209 धावांवर आऊट झाला. यशस्वीने या खेळीत 290 बॉलमध्ये 19 चौकार आणि 7 षटकार ठोकले. यशस्वीनंतर जसप्रीत बुमराह 6 धावांवर आऊट झाला. तर मुकेश कुमार याला भोपळाही फोडता आला नाही. तर कुलदीप यादव 42 चेंडूमध्ये 8 धावा करुन नाबाद राहिला.
दरम्यान पहिल्या दिवशी टीम इंडियाच्या फलंदाजांना यशस्वीचा अपवाद वगळता एकालाही आपली छाप सोडता आली नाही. कॅप्टन रोहित शर्मा याच्यापसून टॉप ते मधल्या फळीतील फलंदाजंनी निराशा केली. काहींना चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्यांना त्याचं मोठ्या खेळीत रुपांतर करता आलं नाही.
यशस्वी एकटाच लढला
Innings Break! #TeamIndia posted 396 runs on the board, with @ybj_19 scoring a mighty 209.
Scorecard ▶️ https://t.co/X85JZGt0EV#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/OVaIuHKbfE
— BCCI (@BCCI) February 3, 2024
रोहित शर्मा 14 धावांवर आऊट झाला. शुबमन गिलने 34 धावाकरुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. श्रेयस अय्यरलाने 27 धावा करुन नेहमीप्रमाणे 50 च्या आत आऊट होण्याची परंपरा कायम ठेवली. डेब्यूटंट रजत पाटीदार हा 32 धावांवर आऊट झाला. रजत चांगला खेळत होता. मात्र तो ज्या पद्धतीने आऊट झाला, ते प्रत्येक भारतीय चाहत्याला जिव्हारी लागणारं होतं. अक्षर पटेल याने 27, विकेटकीपर श्रीकर भरत याने 17 धावा केल्या. इंग्लंडकडून तिघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. जेम्स एंडरसन, बशीर अहमद आणि रेहान अहमद या तिघांना 3-3 विकेट्स मिळाल्या. तर टॉम हार्टली याने 1 विकेट घेत चांगली साथ दिली.
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर आणि जेम्स अँडरसन.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, श्रीकर भारत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार.