विशाखापट्टणम | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. टीम इंडियाने पहिल्या दिवशी 93 षटकांमध्ये 6 विकेट्स गमावून 336 धावा केल्या. खेळ संपला तेव्हा ओपनर यशस्वी जयस्वाल आणि आर अश्विन ही जोडी नाबाद परतली. अश्विन याने नाबाद 5 धावा केल्या. तर यशस्वी द्विशतकाच्या उंबरठ्यावर आहे. यशस्वीने 179 धावांवर नाबाद आहे.
टीम इंडियाकडून पहिल्या डावात यशस्वी जयस्वाल 257 चेंडूत 17 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 179 धावांवर नाबाद आहे. मात्र इतर फलंदाजाना चांगल्या सुरुवातीनंतरही मोठी खेळी करता आली नाही. टीम इंडियाकडून कॅप्टन रोहित शर्मा 14 धावांवर बाद झाला. शुबमन गिल 34 रन्सवर आऊट झाला. श्रेयस अय्यर याने नेहमीप्रमाणे 30 च्या आत होण्याची परंपरा कायम राखत 27 धावा केल्या. डेब्यूटंट रजत पाटीदार दुर्देवी ठरला. रजतने 32 धावा केल्या. अक्षर पटेल याने 27 धावा केल्या. तर विकेटकीपर बॅट्सन श्रीकर भरत याने 17 धावांचं योगदान दिलं. इंग्लंकडून शोएब बशीर आणि रेहान अहमद या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर जेम्स एंडरसन याने 1 विकेट घेतली.
इंडिया इंग्लंड दुसऱ्या कसोटीतील पहिल्या दिवसाचा खेळ संपला
Stumps on Day 1 of the 2nd Test.
Yashasvi Jaiswal batting beautifully on 179*
Scorecard – https://t.co/X85JZGt0EV #INDvENG @IDFCFIRSTBank pic.twitter.com/XlRqDI8Sgt
— BCCI (@BCCI) February 2, 2024
दरम्यान दुसऱ्या दिवशी यशस्वी जयस्वाल याने द्विशतक करणार असल्याचं विश्वासाने म्हटलं आहे. तसेच यशस्वीने 172 धावा करताच स्वत:चा रेकॉर्ड ब्रेक केला. यशस्वीची याआधी कसोटीत 171 ही सर्वोच्च वैयक्तिक खेळी होती. आता दुसऱ्या दिवशी यशस्वीकडून क्रिकेट चाहत्यांना द्विशतकाची आशा आणि अपेक्षा आहे.
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर आणि जेम्स अँडरसन.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, श्रीकर भारत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार.