मुंबई: मँचेस्टर वनडे मध्ये इंग्लंडचा संघ एकवेळ शानदार प्रदर्शन करत होता. त्यांनी 72 धावात भारताच्या चार फलंदाजांना माघारी धाडलं होतं. पण त्यानंतर ऋषभ पंत (Rishabh pant) इंग्लंडच्या मार्गात अडथळा बनला. डावखुऱ्या ऋषभने 113 चेंडूत नाबाद 125 धावा फटकावल्या. वनडे मधलं पहिलं शतक त्याने झळकावलं. पंतने पंड्यासोबत (Hardik pandya) मिळून पाचव्या विकेटसाठी 133 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी तोडण्याची इंग्लंडकडे एक चांगली संधी होती. पण टीमचा कॅप्टन जोस बटलरनेच चूक केली. पंत व्यक्तीगत 18 धावांवर खेळत असताना, बटलरने (Jos buttler) त्याला जीवदान दिलं. पंतची स्टम्पिंग करण्याची संधी वाया दवडली. त्यानंतर भारतीय विकेटकीपर फलंदाजांना इंग्लंडला सामन्यात परतण्याची संधीच दिली नाही. “पंत सारख्या खेळाडूला जीवदान देणं म्हणजे, पराभवाला निमंत्रण देण्यासारखं आहे” असं जोस बटलरने सामन्यानंतर मान्य केलं.
“पंत एक शानदार खेळाडू आहे. तुम्ही त्याला दुसरी संधी दिली, तर तो तुम्हाला धक्का देणार. ऋषभ पंत एक निर्भीड खेळाडू आहे. प्रत्येक फॉर्मेट मध्ये तो कमालीचं क्रिकेट खेळतो. तो आपल्या पद्धतीची बॅटिंग करतो. त्यामुळेच टीम इंडिया त्याला संधी देते” असं बटलर म्हणाला.
?️ “We just haven’t batted our best, we just have to play better for longer.”
Jos Buttler says he isn’t concerned that England didn’t see out the 50 overs and discusses his role as captain ?#ENGvIND pic.twitter.com/0O0HPAZndj
— Sky Sports Cricket (@SkyCricket) July 17, 2022
मँचेस्टर मध्य ऋषभ पंत आपल्या करीयरमधली शानदार इनिंग खेळला. पंतने पहिल्यांदा शतक झळकावलं. त्याने 16 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 125 धावा फटकावल्या. महत्त्वाचं म्हणजे ऋषभ पंतने कठीण काळात ही कामगिरी करुन दाखवली. सेट झाल्यानंतर इंग्लिश गोलंदाजांवर हल्लाबोल केला. शतकानंतर त्याने डेविड विलीच्या एकाच षटकात पाच चौकार लगावले. कसोटी मालिका बरोबरीत सुटल्यानंतर भारताने इंग्लंड विरुद्धची टी 20 मालिका 2-1 अशी जिंकली. आता वनडे सीरीजही खिशात घातली. ऋषभ पंतला सामनावीर तर हार्दिक पंड्याला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.