मुंबई: भारतीय महिला टीमने रविवारी इंग्लंडला पहिल्या वनेडमध्ये हरवलं. तीन सामन्यांच्या सीरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाच्या महिला फलंदाजांनी शानदार खेळ दाखवला. टीमची कॅप्टन हरमनप्रीत कौरने बॅटने कमाल दाखवली. तिने विजयात मोलाचं योगदान दिलं. ती 74 धावांची इनिंग खेळली. फलंदाजीशिवाय तिची आणखी एकागोष्टीसाठी चर्चा आहे. मॅचमध्ये तिने एका कमालीचा झेल घेतला.
हरमनप्रीत कौरने घेतली गजब कॅच
हरमनप्रीतची ही कॅच पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. इंग्लंडची टीम प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरली होती. डेब्यु करणारी एलिस कॅप्सी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरली होती.
गोलंदाजी कोण करत होतं?
तिने 28 चेंडूत 19 धावा केल्या होत्या. 18 व्या ओव्हरमध्ये स्नेह राणा गोलंदाजी करत होती. पहिल्या चेंडूवर एक धाव आली. दुसऱ्या चेंडूवर कॅप्सीने शानदार चौकार लगावला.
हरमनप्रीतच कौतुक कराव तेवढं थोडं
तिसऱ्या चेंडूवर सुद्धा तिचा चौकार मारण्याचा प्रयत्न होता. पण चेंडू जास्त उंच गेला नाही. मिड विकेटला उभ्या असलेल्या हरमप्रीत कौरने कमालीची चपळाई दाखवली. तिने डाइव्ह मारुन एकाहाताने शानदार कॅच पकडली.
बरेच जण हैराण
कोणालाही अशा कॅचची अपेक्षा नव्हती. म्हणून बरेच जण हरमनप्रीतची ही कॅच पाहून हैराण झाले. टीममधल्या सहकाऱ्यांनी सुद्धा हरमनप्रीतच या कॅचसाठी कौतुक केलं.
हरमनप्रीत कौरच्या कॅचचा व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर हरमनप्रीत कौरच्या या कॅचचा व्हिडिओ व्हायरल झालाय. फॅन्सला तिचा सुपरमॅनवाला अंदाज फार आवडला. लोक मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ शेयर करतायत. हरमनप्रीतने याआधी सुद्धा शानदार कॅच पकडली आहे. तुफानी फलंदाजीशिवाय ती शानदार फिल्डिंगसाठी सुद्धा ती ओळखली जाते.
#ENGvIND Harmanpreet ???#CricTracker #Harmanpreet pic.twitter.com/FqQdFJk6w1
— Womenin _blue _Forever (@womenin_blue) September 18, 2022
टीम इंडियाचा इंग्लंडवर सोपा विजय
टीम इंडियासाठी आधी गोलंदाजांनी शानदार प्रदर्शन केलं. त्यानंतर स्मृती मांधना, यस्तिका भाटिया आणि कॅप्टन हरमनप्रीतने दमदार फलंदाजी केली. त्यांच्या अर्धशतकांच्या बळावर टीम इंडियाने सात विकेटने सामना जिंकला. इंग्लंडने 227 धावांच लक्ष्य दिलं होतं. स्मृती मांधना (91), हरमनप्रीत (74) आणि विकेटकीपर फलंदाज यस्तिका भाटियाने (50) धावा केल्या.