भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आज खूप मोठा दिवस आहे. कारण टी-ट्वेन्टी वर्ल्ड कपचा सेमीफायनला सामना आज टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळवला जाणार आहे. हा सामना आज रात्री आठ वाजता खेळवण्यात येणार आहे. पण या सामन्यावर पावसाचं सावट आहे. विशेष म्हणजे टी-ट्वेन्टीचा पहिला सेमीफायनलचा सामना आज सकाळीच पार पडला आहे. हा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात पार पडला. हा सामना दक्षिण आफ्रिकेने अतिशय सहजपणे जिंकत थेट फायनलमध्ये मजल मारली आहे. या सामन्यात पाऊस पडला तर या सामन्यासाठी एक विशेष रिजर्व डे ठेवण्यात आला होता. पण दुसऱ्या सेमीफायनलसाठी रिजर्व डे ठेवण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे दुसरा सेमीफायनलचा सामना हा दोन बलाढ्य संघांमध्ये आहे. या सामन्यावर पावसाचं सावट असलं तरी या सामन्यासाठी रिजर्व डे ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे आजचा सामना हा दोन्ही संघांसाठी करो या मरोच्या धर्तीवर असणार आहे. असं असलं तरी आयसीसीने पाऊस पडला तर या सामन्यासाठी अतिरिक्त वेळ राखीव ठेवण्यात आली आहे. तसेच पाऊस पडला तर ओव्हर कमी करण्याचा नियम देखील घेण्यात आला आहे.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड याच्यातील सेमीफायनलच्या सामन्यासाठी टॉस उडवण्याआधी पाऊस पडला तर सामना सुरु होण्यास वेळ लागू शकतो. या सामन्यासाठी रिजर्व डे नाही. विशेष म्हणजे सेमीफायन आणि फायनल सामन्याच्या दरम्यान केवळ एका दिवसाचा गॅप आहे. याचमुळे या सामन्यासाठी रिजर्व डे ठेवण्यात आलेला नाही. या सेमीफायनलसाठी अतिरिक्त वेळ राखीव ठेवण्यात आला आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री आठ वाजता सुरु होणार आहे. पण पाऊस आला आणि थांबलाच नाही तर रात्री 12.10 वाजेपासून ओव्हरची संख्या कमी करण्याचा निर्णय होईल.
मिळालेल्या माहितीनुसार, या सेमीफायनलमध्ये पावसाने व्यत्यय आणला तर हा सामना 10-10 ओव्हरचा देखील खेळवला जाऊ शकतो. यासाठी रात्री 1.44 वाजेपर्यंतचा कट ऑफ टाईम ठेवण्यात आला. या व्यतिरिक्त आणखी काही नियम ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, टीम इंडियाने संपूर्ण टुर्नामेंटमध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे सेमीफायनल जिंकत भारताने फायनलमध्ये जावं आणि तिथे दक्षिण आफ्रिकेलाही धूळ चारावी, अशी भारतीय क्रिकेट चाहत्यांची इच्छा आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांची ही इच्छा पूर्ण करण्यात टीम इंडियाला कितपत यश येतं? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात पावसामुळे 10-10 ओव्हरची मॅचही झाली नाहीत तर भारतीय संघाला मोठा फायदा होणार आहे. कारण पावसामुळे सामना रद्द झाला तर टीम इंडिया थेट अंतिम सामन्यासाठी सिलेक्ट होणार आहे. तिथे टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेविरोधात लढत होईल. नियमानुसार, सेमीफायनल सामना रद्द झाल्यास पॉईंट टेबलमध्ये टॉपला असणाऱ्या संघाला फायनलमध्ये जाण्याची संधी मिळते. त्यामुळे पावसामुळे सामना रद्द झाल्यास भारतीय संघाला फायनलला जाण्यासाठी दरवाजा खुला असणार आहे.