T20 वर्ल्ड कप 2024 च्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियासमोर इंग्लंडच आव्हान आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडची टीम सेमीफायनलमध्ये सर्वप्रथम पोहोचली. सलग चौथ्यांदा ते T20 वर्ल्ड कपची सेमीफायनल खेळणार आहेत. शेवटचा टी 20 वर्ल्ड कप इंग्लंडनेच जिंकला होता. इंग्लंडचे आकडे टीम इंडियापेक्षा सरस वाटतात. पण जे दिसतय, तसं नाहीय. इंग्लंडच्या काही कमकुवत बाजू सुद्धा आहेत. कितीही लपवल तरी या बाजू समोर येतात. टीम इंडियाची नजर सुद्धा इंग्लंडच्या याच कमकुवत दुव्यांवर असेल. टीम इंडिया हीच बाब ध्यानात घेऊन सेमीफायनलसाठी रणनिती आखेल.
आता प्रश्न हा आहे की, टीम इंडियाचा प्लान काय आहे?. प्लान इंग्लंडच्या कमकुवत बाजूंवर हल्ला करण्याचा आहे. ग्रुप स्टेजमध्ये इंग्लंडची टीम ज्या गोष्टींमुळे हैराण झालेली, तिथेच वार करण्याचा प्रयत्न असेल. इंग्लंडची टीम सेमीफायनल पर्यंत पोहोचली आहे, पण ती कशी पोहोचली? हे सगळ्यांना माहितीय. टुर्नामेंटमध्ये एकवेळ अशी होती, जेव्हा इंग्लंडच्या टीमवर ग्रुप स्टेजमधून बाहेर होण्याच संकट होतं. इंग्लंडची कमकुवत बाजू त्यांच्या बॅटिंग, बॉलिंगशी निगडीत आहे.
इंग्लंडची कमकुवत बाजू कुठली?
इंग्लंड एक मजबूत टीम आहे, यात कुठलही दुमत नाही. टुर्नामेंटमध्ये इंग्लंडचा सांघिक प्रयत्न दिसलेला नाही. त्यांनी सामने जिंकले आहेत, पण एक ते दोन खेळाडूंच्या बळावर. इंग्लंडचे सर्वच खेळाडू फॉर्ममध्ये आहेत, असं आतापर्यंत एकदाही वाटलेलं नाही. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध 200 प्लसच टार्गेट आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 164 रन्सच टार्गेट चेज करण जमलं नाही. इंग्लंडच्या टीममध्ये अनेक आघाड्यांवर कमतरता आहे. त्यांच्या फलंदाजीत त्रुटी आहेत. इंग्लंडच्या फलंदाजांनी धावा केल्या नाहीत, असं नाहीय. फक्त सगळे एकाचवेळी धावा करु शकलेले नाहीत.
टीम इंडियाने या गोष्टी हेरल्या असतीलच
गोलंदाजीत सुद्धा इंग्लंडची हीच स्थिती आहे. मार्क वुड आणि रीस टॉप्ले अजून फॉर्ममध्ये दिसलेले नाहीत. ऑलराऊंडर म्हणून सॅम करणच अपयश सुद्धा दिसून आलय. टीम इंडियाने सेमीफायनलची रणनिती बनवताना या गोष्टी नक्कीच हेरल्या असतील. इंग्लंडच्या याच कमजोरींवर हल्ला करुन विजय मिळवण्याचा प्रयत्न असेल.