मुंबई: टीम इंडियाने (Team India) एकावर्षाच्या आत दुसऱ्यांदा इंग्लंडचा दौरा केला. या कसोटी मालिकेत भारतीय संघ 2-1 ने पुढे होता. पण एजबॅस्टन कसोटीत (Edgebaston Test) टीमचा पराभव झाला व ही सीरीज 2-2 अशी बरोबरीत सुटली. फलंदाजांच खराब प्रदर्शन हे मालिका विजय न मिळण्यामागचं एक कारण आहे. त्यातही माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहलीचा फॉर्म हा चिंतेचा विषय आहे. विराट कोहली मागच्यावर्षी सुद्धा इंग्लंड मध्ये धावा करु शकला नव्हता. यावेळी सुद्धा एकमेव कसोटी सामन्यात त्याची बॅट तळपली नाही. विराट कोहलीचं (Virat kohli) नेमकं काय चुकतय, या बद्दल बऱ्याच चर्चा सुरु आहेत. आता भारताचे माजी कर्णधार व सलामीवीर सुनील गावस्कर यांनी विराट कोहलीचं काय चुकतय, त्यावर आपलं मत मांडलं.
एजबॅस्टन कसोटीत भारतीय संघाचा 7 विकेटने पराभव झाला. या कसोटीच्या दोन्ही डावात कोहलीच्या बॅटमधून धावा निघाल्या नाहीत. पहिल्या इनिंगमध्ये त्याने फक्त 11आणि दुसऱ्याडावात 20 धावा केल्या. आता संघातील त्याच्या स्थानावरही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. इंग्लंडमध्ये नेहमीच चांगली फलंदाजी करणाऱ्या कोहलीचं असं काय झालय. तो का अपयशी ठरतोय?. सुनील गावस्कर यांच्या मते कोहली थोडी घाई करतोय.
माजी दिग्ग्ज क्रिकेटपटू सुनील गावस्कर ‘स्पोर्ट्स टुडे’ युट्यूब चॅनलशी बोलताना म्हणाले की, “विराट कोहलीने इंग्लंड मधल्या परिस्थितीनुसार खेळ केला नाही” “इंग्लंड मध्ये खेळताना तुम्हाला शक्य असेल, तितका चेंडू उशिराने खेळा ही एक टेक्निक आहे. असं केल्यास चेंडू आधी त्याला हवं तसा मुव्ह होतो, नंतर तुम्ही खेळता. मी हायलाइटस मध्ये जे पाहिलं, ते पाहिल्यानंतर असं वाटलं की, कोहली चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू तो लवकर खेळण्याचा प्रयत्न करत होता” असं गावस्कर म्हणाले.
“कोहली जी घाई करतोय, त्याला खराब फॉर्म सुद्धा जबाबदार आहे” असं गावस्कर म्हणाले. “खराब फॉर्म सुरु असताना, फलंदाज प्रत्येक चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतो. त्यात चुका होतात” असं गावस्कर म्हणाले.