IND vs IRE 1st T20 | डेब्युमध्येच 6 चेंडूत त्याने जिंकलं, बुमराहसारखच टीम इंडियात पुनरागमन करताना कहर

| Updated on: Aug 19, 2023 | 8:20 AM

IND vs IRE 1st T20 | बुमराहप्रमाणेच तो सुद्धा वर्षभर दुखापतीमुळे टीम इंडियाच्या बाहेर होता. या मॅचमध्ये बाऊन्सर चेंडू टाकण्याची खासियत दिसून आली. आगामी आशिया कप आणि वर्ल्ड कपच्या टीममध्ये निवडीसाठी तो सुद्ध एक दावेदार आहे.

IND vs IRE 1st T20 | डेब्युमध्येच 6 चेंडूत त्याने जिंकलं, बुमराहसारखच टीम इंडियात पुनरागमन करताना कहर
Ind vs ire 1st t20 prasidh krishna
Image Credit source: instagram
Follow us on

डबलिन : सगळ्यांच्या नजरा जसप्रीत बुमराह आणि रिंकू सिंह यांच्यावर होत्या. या दोघांची चर्चा भरपूर झाली. पण टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड हा T20 सीरीजमधील पहिला सामना या दोघांशिवाय आणखी एका खेळाडूसाठी खास होता. त्याच नाव आहे, प्रसिद्ध कृष्णा. त्याने टी 20 फॉर्मेटमध्ये डेब्यु केला. त्याच्यासाठी ही मॅच फक्त डेब्युसाठी खास नव्हती, तर जसप्रीत बुमराहप्रमाणे त्याने दीर्घकाळानंतर टीम इंडियात पुनरागमन केलं. बुमराह प्रमाणे प्रसिद्ध कृष्णाने सुद्धा पुनरागमनाच जोरदार सेलिब्रेशन केलं.

शुक्रवार 18 ऑगस्टपासून भारत आणि आयर्लंडमध्ये मॅलेहाइड येथे तीन टी 20 सामन्यांची सीरीज सुरु झाली आहे. सीरीजच्या पहिल्या सामन्यात प्रसिद्ध कृष्णा आणि रिंकू सिंह या दोघांना डेब्युची संधी मिळाली. चर्चा रिंकू सिंहची होती, त्याचा तो अधिकार सुद्धा आहे.

रिंकूला संधीच मिळाली नाही

आयपीएलमधील आक्रमक बॅटिंग आणि फिनिशिंग टच देण्याच्या कौशल्यामुळे रिंकूने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. रिंकूला आपली कमाल दाखवता आली नाही. कारण त्याला बॅटिंगची संधीच मिळाली नाही. पण प्रसिद्ध कृष्णाने मिळालेल्या संधीचे पुरेपूर वापर करुन घेतला.

शेवटचा सामना कधी खेळला होता?

टीम इंडियाने या सामन्यात पहिली गोलंदाजी केली. त्यामुळे प्रसिद्ध कृष्णाला गोलंदाजीची संधी मिळाली. जसप्रीत बुमराहने पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट घेऊन वातावरण निर्मिती केली. त्यानंतर पाचव्या ओव्हरमध्ये प्रसिद्ध गोलंदाजीसाठी आला. मागच्यावर्षी झिम्बाब्वे विरुद्ध ऑगस्ट महिन्यात तो वनडे सीरीज खेळला होता. त्यानंतर त्याची ही पहिली ओव्हर होती. त्याने निराश केलं नाही. लेग साइडला वाईड चेंडू टाकून त्याने सुरुवात केली. त्यानंतर त्याला त्याची लय सापडली. शेवटच्या चेंडूवर त्याने टॅक्टरला आऊट केलं.

मधली फळी मोडून काढली

प्रसिद्धने आपल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये टीमला यश मिळवून दिलं. यावेळी त्याने अनुभवी ऑलराऊंडर जॉर्ज डॉकरेलची विकेट काढली. टीमकडून सातवी ओव्हर टाकणाऱ्या प्रसिद्धच्या गोलंदाजीवर जॉर्ज डॉकरेलने कव्हर्सच्या फिल्डरकडे कॅच दिली. अशा प्रकारे प्रसिद्धने आयर्लंडची मीडल ऑर्डर ध्वस्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

प्रसिद्ध कृष्णा त्याच्या लास्ट ओव्हरमध्ये थोडा महागडा ठरला. त्याने 4 ओव्हरमध्ये 32 धावा देऊन 2 विकेट काढल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने अपेक्षित कमबॅक केलं. या मॅचमध्ये प्रसिद्धची बाऊन्सर चेंडू टाकण्याची खासियत दिसून आली. आगामी आशिया कप आणि वर्ल्ड कपच्या टीममध्ये निवडीसाठी तो सुद्ध एक दावेदार आहे.