IND vs NED, T20 WC 2022: केएल राहुलच्या विकेटसाठी रोहित शर्मा जबाबदार, अतिआत्मविश्वास नडला

| Updated on: Oct 27, 2022 | 2:58 PM

IND vs NED, T20 WC 2022: केएल राहुल LBW आऊट झाला, पण मैदानात नेमकं घडलं काय?

IND vs NED, T20 WC 2022: केएल राहुलच्या विकेटसाठी रोहित शर्मा जबाबदार, अतिआत्मविश्वास नडला
KL Rahul
Image Credit source: icc
Follow us on

सिडनी: नेदरलँडस विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी ओपनिंग जोडीकडून सर्वाधिक धावांची अपेक्षा होती. पण ही अपेक्षा चुकीची ठरली. रोहित शर्माच्या एका निर्णयाचा टीमला फटका बसला. केएल राहुलचा विकेट गमावून टीम इंडियाला रोहितच्या या निर्णयाचा किंमत चुकवावी लागली. आता प्रश्न हा आहे की, भर मैदानात असं काय झालं? केएल राहुलच्या विकेटसाठी रोहित शर्मा कसा जबाबदार ठरला?

त्याने विचार केला होता, पण….

हा सर्व विषय भारतीय डावाच्या तिसऱ्या ओव्हरशी संबंधित आहे. यात केएल राहुल आऊट झाला. ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर केएल राहुल विरोधात LBW चं जोरदार अपील करण्यात आलं. या अपील विरोधात केएल राहुलने DRS घेण्याचा विचार केला. पण कॅप्टन रोहित शर्माने मोठ्या आत्मविश्वासाने त्याला असं करण्यापासून रोखलं.

रोहित शर्माचा निर्णय राहुलसाठी ठरला घातक

केएल राहुल आऊट होऊन डग आऊटमध्ये परतला. राहुल बाद झाला, त्यावेळी भारताची धावसंख्या 11 होती. राहुल 9 धावांवर खेळत होता. राहुल चांगल्या टचमध्ये वाटत होता. पण एका चेंडूवर भारताला राहुलची विकेट गमावून किंमत चुकवावी लागली.

राहुल डगआऊटमध्ये परतल्यानंतर LBW चा रिप्ले पाहण्यात आला. त्यात चेंडू स्टम्पसला लागणार नव्हता असं दिसलं. म्हणजेच DRS घेतला असता, तर तो नाबाद ठरला असता.


कोणी काढली राहुलची विकेट?

नेदरलँडच्या पॉल वॅन मिकरनने राहुलची विकेट काढली. या विकेटसह टी 20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये नेदरलँडचा तो यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने पीटर सीलरचा 58 विकेटसचा रेकॉर्ड मोडला.