IND vs NZ 1st T20 : न्यूझीलंडने पहिल्या T20 सामन्यात टीम इंडियाचा 21 धावांनी पराभव केला. या विजयासह न्यूझीलंडने सीरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतलीय. टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये रांची येथे पहिला T20 सामना झाला. शुभमन गिल, हार्दिक पंड्या, इशान किशन, दीपक हुड्डा आणि उमरान मलिक यांच्यापैकी कोणीच चाललं नाही. भारताकडून फक्त वॉशिंग्टन सुंदरने ऑलराऊंडर खेळ दाखवला. आधी बॉलिंगमध्ये महत्त्वाच्या क्षणी विकेट घेऊन आणि नंतर बॅटिंगमध्ये कमाल दाखवली.
कमालीचा ऑलराऊंडर परफॉर्मन्स
वॉशिंग्टन सुंदरच्या ऑलराऊंडर परफॉर्मन्सने हार्दिक पंड्याही प्रभावित झाला. सामना संपल्यानंतर तो म्हणाला की, “सामना भारत-न्यूझीलंडमध्ये नाही, तर वॉशिंग्टन सुंदर आणि न्यूझीलंडमध्ये होता” हार्दिकच्या मते किवी टीम फक्त सुंदर विरुद्ध खेळत होती.
नाही चालले भरवशाचे खेळाडू
न्यूझीलंडने पहिली बॅटिंग केली. त्यांनी निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट गमावून 176 धावा केल्या. डॅरिल मिचेलने 30 चेंडूत नाबाद 59 रन्स ठोकल्या. डेवॉन कॉनवेने 35 चेंडूत 52 धावा फटकावल्या. सुंदरने 22 रन्स देऊन 2 विकेट काढल्या. अर्शदीप सिंह, कुलदीप यादव आणि शिवम मावीने प्रत्येकी 1-1 विकेट काढली. 177 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या टीम इंडियाने एकवेळ 15 धावात 3 विकेट गमावल्या होत्या.
सूर्या आणि सुंदरची बॅट चालली
सूर्यकुमार यादवने या सामन्यात 47 रन्स आणि वॉशिंग्टने सुंदरने 50 धावा करुन डाव संभाळण्याचा प्रयत्न केला. पंड्याने 21 रन्स केल्या. पण गोलंदाजीत तो महागडा ठरला.
हार्दिककडून ‘त्या’ दोघांच तोंडभरुन कौतुक
“विकेट अशा पद्धतीने बदलेल याचा कोणीही विचार केला नव्हता. दोन्ही टीम्स हैराण होत्या. पण न्यूझीलंडने चांगला खेळ दाखवला. सूर्या आणि मी बॅटिंग करताना आम्ही जिंकू अशी अपेक्षा होती. आम्ही 25 रन्स जास्त दिल्या. सुंदरने ज्या पद्धतीची बॉलिंग, फिल्डिंग आणि बॅटिंग केली, ते पाहून सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड नाही, तर न्यूझीलंड विरुद्ध सुंदर सामना सुरु आहे, असं वाटलं. सुंदर आणि अक्षर पटेल यांनी अशीच प्रगती केली, तर भारतीय क्रिकेटचा खूप फायदा आहे” असं हार्दिक पंड्या म्हणाला.