IND vs NZ, 1st T20, LIVE Streaming : जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल सामना?

| Updated on: Nov 17, 2021 | 11:47 AM

आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत अपयशी ठरलेला भारतीय संघ आता झालंगेलं विसरुन न्यूझीलंविरुद्धची टी-20 मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. ही मालिका भारतात खेळवली जाणार आहे.

IND vs NZ, 1st T20, LIVE Streaming : जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल सामना?
Indian Cricket Team
Follow us on

मुंबई : आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत अपयशी ठरलेला भारतीय संघ आता झालंगेलं विसरुन न्यूझीलंविरुद्धची टी-20 मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. ही मालिका भारतात खेळवली जाणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना जयपूर येथे होणार असून, या दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत अपेक्षित आहे. जयपूरमध्ये होणारा हा पहिला T20 आंतरराष्ट्रीय सामना असेल. याआधी आंतरराष्ट्रीय सामन्याच्या नावावर येथे केवळ 12 वनडे आणि 1 कसोटी सामना खेळवण्यात आला आहे. (IND vs NZ, 1st T20, LIVE Streaming : Know when and where to watch match)

भारतीय संघाला या फॉरमॅटमध्ये रोहित शर्माच्या रूपाने नवा कर्णधार आणि राहुल द्रविडच्या रूपाने नवा प्रशिक्षक मिळाला आहे. पुढील T20 विश्वचषकापूर्वी क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये मजबूत संघ तयार करण्यासाठी द्रविड आणि रोहित या जोडीकडे केवळ 11 महिने असतील. यादरम्यान त्यांना संघात आवश्यक बदल आणि सुधारणा कराव्या लागतील. या मालिकेसाठी भारतीय संघाने अनेक दिग्गज खेळाडूंना विश्रांती दिली असून अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत मिळालेल्या या संधीचा हे खेळाडू कितपत फायदा घेतात हे पाहावे लागेल.

भारत आणि न्यूझीलंड टी-20 यांच्यातील सामना कधी खेळवला जाणार?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना 17 नोव्हेंबर (बुधवार) होणार आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना कुठे होणार?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना जयपूरच्या सवाई मानसिंग क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना कधी सुरू होणार?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. नाणेफेक संध्याकाळी 6.30 वाजता होईल.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण कोठे पाहता येईल?

भारत आणि न्यूझीलंडमधील हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर वेगवेगळ्या भाषांमध्ये पाहता येईल.

भारत आणि न्यूझीलंडमधील लाईव्ह स्ट्रीमिंग ऑनलाइन कुठे पाहू शकतो?

Disney+Hotstar वर लाइव्ह स्ट्रीमिंग सबस्क्रिप्शनसह सामना ऑनलाइन पाहता येईल. याशिवाय tv9marathi.com वरही सामन्याचे लाईव्ह अपडेट्स वाचता येतील.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग XI

न्यूझीलंडची प्लेइंग इलेव्हन

मार्टिन गप्टिल, डॅरेल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टिम सायफर्ट (यष्टीरक्षक), जिमी नीशम, मिचेल सँटनर, टिम साउथी (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, ईश सोढी, काइल जेमिसन

भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ : मार्टिन गप्टिल, डॅरेल मिशेल, टिम सायफर्ट, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, जिमी निशम, काईल जेमिसन, टॉड अॅस्टले, टीम साऊथी, ट्रेंट बोल्ट, अॅडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन, मिचेल सँटनर आणि ईश सोढी

भारताची प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, इशान किशन, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप-कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.

इतर बातम्या

IND vs NZ Head to Head Records in T20Is : टीम इंडिया की न्यूझीलंड, जयपूरमध्ये कोणाचं पारडं जड?

आंतरराष्ट्रीय सामन्यात 27 धावांत संघ ऑलआऊट, 7 खेळाडू शून्यावर बाद, वाचा कुठे घडला ‘हा’ अजब सामना

IND vs NZ: रोहित शर्माच्या कर्णधार असताना विराट संघात काय करणार?, रोहितनेच दिलं उत्तर


(IND vs NZ, 1st T20, LIVE Streaming : Know when and where to watch match)