टीम इंडियाने न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी लाज घालवली आहे. टीम इंडियासोबत मायदेशात अद्याप कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असं कधीच झालं नव्हतं. टीम इंडियाचा डाव अवघ्या 46 धावांवर आटोपला आहे. टीम इंडियाची ही मायदेशातील सर्वाच निच्चांकी धावसंख्या ठरली आहे. टीम इंडियाकडून फक्त दोघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. तर 5 जणांना भोपळाही फोडता आला नाही. तर तिघांनी नाममात्र धावा केल्या. न्यूझीलंडकडून मॅट हेन्री याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.
टीम इंडियाकडून फक्त दोघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. तर चौघांनाच खातं उघडता आलं. तर 5 जण आले तसेच मैदानाबाहेर गेले. टीम इंडियाकडून यशस्वी जयस्वाल आणि ऋषभ पंत या दोघांनी अनुक्रमे 13 आणि 20 अशा धावा केल्या. त्यानंतर. कॅप्टन रोहित शर्मा (2) , कुलदीप यादव (2), जसप्रीत बुमराह 1 आणि मोहम्मद सिराज याने नाबाद 4 धावा केल्या. तर विराट कोहली, सर्फराझ खान, केएल राहुल, रवींद्र जडेजा आणि आर अश्विन हे 5 जण झिरोवर आऊट झाले. तर न्यूझीलंडकडून मॅट हेन्री याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर विलियम ओरुर्केने चौघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर टीम साऊथीने 1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.
दरम्यान टीम इंडियाने मायदेशात सर्वात निच्चांकी धावसंख्या केली आहे. टीम इंडियाने याआधी 1979 साली विंडिज विरुद्ध 75 धावा केल्या होत्या. तसेच टीम इंडियाची कसोटी क्रिकेटमधील 46 ही तिसरी निच्चांकी धावसंख्य ठरलीय. टीम इंडिया 2020 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 36 धावांवर ऑलआऊट झाली होती. त्यानंतर आता 4 वर्षांनी पुन्हा एकदा टीम इंडियाला एका डावात 50 पेक्षाही अधिक धावा करता आल्या नाहीत.
Innings Break!#TeamIndia all out for 46.
Over to our bowlers now! 👍 👍
Match Updates ▶️ https://t.co/8qhNBrrtDF#INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/GhqcZy2rby
— BCCI (@BCCI) October 17, 2024
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, विराट कोहली, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टॉम लॅथम (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचीन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, टीम साउथी, एजाझ पटेल आणि विल्यम ओरूर्के.