Sanju Samson: संजूच करिअर संपवायच टीम मॅनेजमेंट ठरवलय का? सॅमसनला बाहेर केल्याने भडकले फॅन्स

| Updated on: Nov 27, 2022 | 1:41 PM

Sanju Samson: तुम्हीच ठरवा, हा संजूवर अन्याय नाही का?

Sanju Samson: संजूच करिअर संपवायच टीम मॅनेजमेंट ठरवलय का? सॅमसनला बाहेर केल्याने भडकले फॅन्स
संजू सॅमसन
Image Credit source: social
Follow us on

हॅमिल्टन: आज दुसरा वनडे सामना पावसामुळे रद्द झाला. 12.5 ओव्हर्सनंतर पुढे खेळ होऊ शकला नाही. कॅप्टन शिखर धवनने आजच्या मॅचसाठी प्लेइंग 11 जाहीर करताना सर्वांनाच चक्रावून टाकणारा एक निर्णय घेतला. चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या संजू सॅमसनला बाहेर बसवलं. त्याच्याजागी दीपक हुड्डाला संधी दिली. धवनच्या या निर्णयावर संजूचे फॅन्स चांगलेच संतापले. त्यांनी सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला.

टीम मॅनेजमेंटवरही त्यांनी निशाणा साधला. न्यूझीलंडचा कॅप्टन केन विलयम्सनने टॉस जिंकून पहिली फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला.

संजू आणि शार्दुल बाहेर

हॅमिल्टनच्या सेडान पार्क मैदानात सामना झाला. दोन्ही टीम्समध्ये बदल करण्यात आले होते. वनडेमध्ये टीम इंडियाच्या कॅप्टनशिपची जबाबदारी शिखर धवनवर आहे. त्याने शार्दुल ठाकूर आणि संजू सॅमसनला बाहेर बसवलं. त्याच्याजागी दीपक हुड्डा आणि दीपक चाहरचा टीममध्ये समावेश केला. न्यूझीलंडच्या टीममध्येही एक बदल करण्यात आला. मायकल ब्रेसवेसच्या जागी एडम मिल्नेला संधी दिली.


सोशल मीडियावर फॅन्सनी असा काढला राग

संजू सॅमसनला संधी न दिल्याने त्याचे फॅन्स चांगलेच भडकले. “संजूच करिअर संपवायच असं टीम मॅनेजमेंटने ठरवलेलं दिसतय” असं एका युजरने लिहिलं होतं. सीरीज जिंकण्यासाठी आजचा सामना होणं आवश्यक होते. पण पावसाने पाणी फिरवलं. तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंड 1-0 ने आघाडीवर आहे. आता तिसरा सामना बाकी आहे. टीम इंडियाकडे आता फक्त बरोबरी करण्याची संधी आहे.

संजूची मागच्या चार सामन्यातील कामगिरी पहा

संजू सॅमसनने मागच्या चार वनडेत 86*, 30*, 2*, 36 अशा धावा केल्या आहेत. 3 वेळा नाबाद आणि एक अर्धशतक त्याच्या नावावर आहे. या आकड्यांवरुन स्पष्ट होतं, कोणाला संधी दिली पाहिजे. सूर्यकुमार यादवच्या जागी दीपक हुड्डा चांगला पर्याय ठरला असता. कारण त्यामुळे सतत क्रिकेट खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवला आराम मिळाला असता.