IND vs NZ 2nd ODI Match: भारत-न्यूझीलंड वनडे सीरीजमधला दुसरा सामना 21 जानेवारीला रायपूरमध्ये खेळला जाणार आहे. टीम इंडिया सध्या या सीरीजमध्ये 1-0 ने आघाडीवर आहे. सहसा विजयी टीम रोहित शर्मा बदलत नाही. पण दुसऱ्या वनडेसाठी टीम इंडियात आता एका खेळाडूच खेळणं कठीण दिसतय. हा खेळाडू न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या मॅचमध्ये फ्लॉप ठरला होता. कॅप्टन रोहित शर्मा पुढच्या मॅचमध्ये या खेळाडूला प्लेइंग 11 बाहेर बसवू शकतो. न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या वनडे मॅचमध्ये कॅप्टन रोहित शर्माने ऑलराऊंडर म्हणून वॉशिंग्टन सुंदरचा प्लेइंग 11 मध्ये समावेश केला होता. पण वॉशिंग्टन सुंदर या संधीचा फायदा उचलण्यात कमी पडला.
पहिल्या वनडेत कसा आहे परफॉर्मन्स?
बॉल बरोबर बॅटने सुद्धा तो कमाल दाखवू शकला नाही. पहिल्या वनडेमध्ये वॉशिंग्टन सुंदरने 14 चेंडूत फक्त 12 धावा केल्या. 7 ओव्हरमध्ये 50 धावा दिल्या. पण एक विकेटही घेतली नाही. या खराब प्रदर्शनाचा सुंदरला फटका बसू शकतो.
टेस्ट, वनडे आणि T20 मध्ये कशी आहे त्याची कामगिरी?
23 वर्षांचा वॉशिंग्टन सुंदर आतापर्यंत 4 कसोटी सामने खेळलाय. त्याने 265 धावा देऊन 6 विकेट काढल्यात. 14 वनडे आणि 32 T20 सामने खेळलाय. वनडेत 224 धावा आणि 14 विकेट काढल्यात. टी 20 मॅचमध्ये सुंदर खालच्या क्रमाकावर फलंदाजी करतो. तिथे त्याने 47 धावा आणि 26 विकेट काढल्यात.
दुसऱ्या वनडेसाठी ‘या’ खेळाडूला मिळू शकते संधी
वॉशिंग्टन सुंदरच्या जागी शाहबाज अहमदला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळू शकते. 28 वर्षांचा शाहबाज अहमद टीम इंडियासाठी आतापर्यंत 3 वनडे सामने खेळलाय. शाहबाज अहमदने या सामन्यात 4.81 च्या इकॉनमीने 3 विकेट घेतल्यात.
टीम इंडिया –
रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, रजत पाटीदार, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), वॉशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.