ख्राइस्टचर्च: भारत आणि न्यूझीलंडमध्ये बुधवारी तिसरा आणि शेवटचा वनडे सामना खेळला जाणार आहे. सीरीजमध्ये 1-0 ने पुढे असलेल्या न्यूझीलंडचा सीरीज जिंकण्याचा प्रयत्न असेल. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम पराभव टाळण्यासाठी मैदानात उतरेल. न्यूझीलंडलने पहिली वनडे 7 विकेटने जिंकून मालिकेत आघाडी घेतली होती. पावसामुळे दुसरा वनडे सामना रद्द झाला होता. त्यामुळे भारताचं नुकसान झालं. दुसरा वनडे पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे टीम इंडियाची मालिका विजयाची अपेक्षा संपुष्टात आली. भारतीय टीम आता सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न करेल. भारताने टी 20 सीरीज 1-0 ने जिंकली होती.
न्यूझीलंडच पारडं जड
हेग्ले ओव्हलच्या मैदानावर भारत अजूनपर्यंत एकही वनडे सामना खेळलेला नाही. मागच्यावेळी 2020 साली टीम इंडिया येथे टेस्ट मॅच खेळण्यासाठी उतरली होती. या मैदानावर न्यूझीलंडची बाजू वरचढ आहे. यजमानांनी या मैदानात 11 पैकी 10 सामने जिंकलेत.
Preps ? #TeamIndia gear up for the 3⃣rd #NZvIND ODI in Christchurch ? ? pic.twitter.com/2nkFpFNi77
— BCCI (@BCCI) November 29, 2022
कधी, कुठे आणि कसा पाहू शकता सामना
कधी खेळला जाणार भारत विरुद्ध न्यूझीलंडमध्ये तिसरा वनडे सामना ?
भारत आणि न्यूझीलंडमध्ये तीन वनडे सामन्याची सीरीज होणार आहे. तिसरा वनडे सामना बुधवारी 30 नोव्हेंबरला होणार आहे.
भारत आणि न्यूझीलंडमध्ये तिसरा वनडे सामना कुठे खेळला जाणार?
भारत आणि न्यूझीलंडमध्ये तिसरा वनडे सामना ख्राइस्टचर्चच्या हेग्ले ओव्हल मैदानात खेळला जाणार.
कधी सुरु होणार भारत-न्यूझीलंडमध्ये तिसरी वनडे मॅच ?
भारत आणि न्यूझीलंडमध्ये वनडे सीरीजचा तिसरा सामना सकाळी 7 वाजता सुरु होईल. टॉस सकाळी 6.30 वाजता उडवला जाईल.
भारत-न्यूझीलंडमध्ये तिसऱ्या वनडे मॅचच लाइव्ह टेलिकास्ट कुठे होणार?
भारत-न्यूझीलंडमधील तिसऱ्या वनडे मॅचच लाइव्ह टेलीकास्ट डीडी स्पोर्ट्सवर होणार आहे.
भारत-न्यूझीलंडमधील तिसऱ्या वनडे मॅचच लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे होणार?
भारत-न्यूझीलंडमधील तिसऱ्या वनडे मॅचच लाइव्ह स्ट्रीमिंग एमेजॉन प्राइमवर होणार आहे.