नेपियर: टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये तिसरा टी 20 सामना सुरु आहे. पहिली बॅटिंग करणारी न्यूझीलंडची टीम 160 धावांवर ऑलआऊट झाली. डेवॉन कॉनवे आणि ग्लेन फिलिप्सची जोडी मैदानावर असेपर्यंत न्यूझीलंड मोठी धावसंख्या उभारणार असं वाटत होतं. पण मोहम्मद सिराजने ही जोडी फोडली. त्यानंतर न्यूझीलंडचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी केली.
सिराज-अर्शदीपने सामनाच बदलून टाकला
दमदार फलंदाजी करणाऱ्या कॉनवेला अर्शदीपने 59 रन्सवर इशान किशनकरवी कॅचआऊट केलं. त्यानंतर पुढच्या 3 रन्समध्ये न्यूझीलंडच्या 6 विकेट गेल्या. 146 ते 149 दरम्यान सिराज-अर्शदीपने सामनाच बदलून टाकला. अर्शदीपने या सामन्यात ईश सोढीच्या एका अप्रतिम यॉर्कवर दांड्या गुल केल्या.
Pin point yoker#arshdeep ?#NZvIND pic.twitter.com/sMRtOFTeA6
— S.H.Tyron (@tyron1808) November 22, 2022
अप्रतिम यॉर्कर
अर्शदीपने 18 व्या षटकातील दुसरा चेंडू इतका जबरदस्त टाकला की, ईश सोढी काही करुच शकला नाही. तो शुन्यावर क्लीन बोल्ड झाला. अर्शदीपने आज 4 ओव्हरमध्ये 37 धावा देऊन 4 विकेट काढल्या. त्याने आणि सिराजने न्यूझीलंडला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखलं.