कोलकाता : टीम इंडियानं जयपूर येथील पहिल्या टी-20 न्यूझीलंडला पराभूत केलं. रांची येथील दुसरी टी-20 मॅच जिंकत टीम इंडियानं मालिका खिशात घातली आहे. रोहित शर्माच्या टीमला न्यूझीलंडच्या टीमला व्हाईट वॉश देण्याची संधी आहे. पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडिया विजयासाठी संघर्ष करावा लागला होता. तर, दुसऱ्या सामन्यात टीम इंडियानं एकतर्फी विजय मिळवला होता.
भारतीय संघाने अनेक दिग्गज खेळाडूंना विश्रांती दिली असून अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आहे. तिसऱ्या टी-20 मॅचसाठी टीम इंडिया कोणत्या खेळाडूंना संधी देणार हे पाहावं लागणार आहे. दुसऱ्या मॅचमध्ये हर्षल पटेलला संधी देण्यात आली होती. टीम इंडिया न्यूझीलंडला व्हाईट वॉश देणार का हे पाहावं लागणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड टी-20 यांच्यातील तिसरा सामना कधी खेळवला जाणार?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना 21 नोव्हेंबर रोजी (शुक्रवार) होणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना कुठे होणार?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना कोलकाता येथील ईडन गार्डन स्टेडियमवर होणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना कधी सुरू होणार?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. नाणेफेक संध्याकाळी 6.30 वाजता होईल.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण कोठे पाहता येईल?
भारत आणि न्यूझीलंडमधील हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर वेगवेगळ्या भाषांमध्ये पाहता येईल.
भारत आणि न्यूझीलंडमधील लाईव्ह स्ट्रीमिंग ऑनलाइन कुठे पाहू शकतो?
Disney+Hotstar वर लाइव्ह स्ट्रीमिंग सबस्क्रिप्शनसह सामना ऑनलाइन पाहता येईल. याशिवाय tv9marathi.com वरही सामन्याचे लाईव्ह अपडेट्स वाचता येतील.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग XI
न्यूझीलंडची प्लेइंग इलेव्हन
मार्टिन गप्टिल, डॅरेल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टिम सायफर्ट (यष्टीरक्षक), जिमी नीशम, मिचेल सँटनर, टिम साउथी (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, ईश सोढी, काइल जेमिसन
भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ : मार्टिन गप्टिल, डॅरेल मिशेल, टिम सायफर्ट, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, जिमी निशम, काईल जेमिसन, टॉड अॅस्टले, टीम साऊथी, ट्रेंट बोल्ट, अॅडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन, मिचेल सँटनर आणि ईश सोढी
भारताची प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, इशान किशन, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप-कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.
इतर बातम्या:
IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्धची मालिका भारताच्या खिशात, दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा शानदार विजय
IND vs NZ : रांचीचं ‘रण’ जिंकण्यासाठी न्यूझीलंडने टीम बदलली, भारताकडून एका खेळाडूचं पदार्पण
Ind vs Nz 3rd t20 live streaming know when and where to watch match