IND vs NZ 3rd T20 : टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये T20 सीरीजमधील आज तिसरा आणि अखेरचा सामना होणार आहे. दुसरा सामना 6 विकेटने जिंकून टीम इंडियाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. लखनौमध्ये दुसऱ्या टी 20 सामन्यात विकेटकडून स्पिनर्सना मदत मिळाली होती. त्यामुळे युजवेंद्र चहलचा प्लेइंग 11 मध्ये समावेश केला होता. तिसरा टी 20 सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. या पीचवर खेळताना हार्दिक पंड्याला टीममध्ये एका घातक वेगवान गोलंदाजाचा समावेश करावा लागेल. अशा स्थितीत चहलला आजच्या मॅचमध्ये बाहेर बसावं लागू शकतं.
‘या’ वेगवान गोलंदाजाच पुनरागमन
न्यूझीलंड विरुद्ध तिसऱ्या टी 20 सामन्यासाठी उमरान मलिकला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळू शकतं. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हाय स्कोरिंग मॅचेस झाल्या आहेत. इथे बाऊंड्रीज सुद्धा तितक्या लांब नाहीयत. त्यामुळे वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव व्यतिरिक्त तिसऱ्या स्पिनरला संधी मिळण्याची शक्यता नाहीय. प्लेइंग 11 मध्ये उमरानच्या समावेशामुळे गोलंदाजी बळकट होईल. वेग ही उमरानच्या गोलंदाजीची ताकत आहे. याच एक्सप्रेस पेसमुळे उमरान जगभरातील बॅट्समन्सवर भारी पडतो.
वेगामुळेच महागडा ठरतो
उमरान या सीरीजच्या पहिल्या सामन्यात खेळला होता. दुसऱ्या सामन्यात पीचची स्थिती पाहून त्याला बाहेर ठेवण्यात आलं. पहिल्या सामन्यात कॅप्टन हार्दिक पंड्याने 8 व्या ओव्हरमध्ये उमरानला गोलंदाजीसाठी आणलं. उमरानची ती ओव्हर महागडी ठरली. त्याने 16 धावा दिल्या. त्यानंतर हार्दिकने पुन्हा त्याला गोलंदाजी दिली नाही. अनेकदा स्पीडमुळेच उमरान महागडा गोलंदाज ठरतो. उमरानचा दिवस असेल, तर दिग्गज फलंदाजांचही त्याच्यासमोर काही चालणार नाही.
असं आहे करिअर
उमरान मलिक आतापर्यंत भारतासाठी 6 T20 सामने खेळलाय. या दरम्यान, तो 9 विकेट घेण्यात तो यशस्वी ठरलाय. पण त्याच्या बॉलिंगची इकॉनमी 11 पेक्षा पण जास्त होती. भारतासाठी 8 वनडे सामन्यात उमरानने 13 विकेट घेतल्यात. वनडेत त्याने 6.45 च्या इकॉनमीने गोलंदाजी केली. उमरानकडे 150 KMPH वेगाने गोलंदाजी करण्याच टॅलेंट आहे. त्यामुळे तो इतर गोलंदाजांपेक्षा वेगळा ठरतो. तिसऱ्या टी 20 सामन्यात उमरानला संधी देऊन हार्दिक वेगवान गोलंदाजीची धार अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करेल.